Friday, 26 March 2021

मुरबाड पंचायत समितीच्या सभापती पदी दिपक पवार यांची निवड !!

मुरबाड पंचायत समितीच्या सभापती पदी दिपक पवार यांची निवड !!


मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड पंचायत समितीचे सभापती पदी दिपक पवार यांची निवड झाली आहे 
मावळते सभापती श्रीकांत धुमाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणुक झाली मुरबाड पंचायत समितीवर भाजपची सत्ता आहे  एकूण 16 सदस्यांपैकी भाजपचे 10 सदस्य आहेत.

आज शुक्रवारी झालेल्या निवडणुकीचे वेळी सभापती पदासाठी पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अमोल कदम यांनी पवार यांची निवड झाल्याचे जाहिर केले गेल्या चार वर्षातील ते चौथे सभापती आहेत .

No comments:

Post a Comment

स्वर्गीय अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन !!

स्वर्गीय अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन !! उरण दि २५,'(विठ्ठल ममताबादे)...