Friday 26 March 2021

दिल्लीमधील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा मुरबाड मध्ये तीव्र आंदोलन करू - 'तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार'

दिल्लीमधील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा मुरबाड मध्ये तीव्र आंदोलन करू - 'तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार' 


मुरबाड, (मंगल डोंगरे) : शुक्रवार दि.२६ मार्च २०२१ रोजी केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी काळे कायदे मागे घेण्याबाबतची मागणी महामहीम राष्ट्रपतींना 
मुरबाड तालुका तहसिलदार यांच्या मार्फत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वामध्ये व सेवादलाचे जिल्हाध्यक्ष नरेश मोरे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष संध्या कदम, शेतकरी प्रतिनिधी जयवंत पवार, अल्पसंख्यांकचे इम्रान पटेल, गणेश खारे, गुरूनाथ देशमुख, वसंत कराळे आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले. 


केंद्रातील भाजपा सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे तीन कृषीविषयक काळे कायदे पाशवी बहुमताचा फायदा घेवुन संसदेमध्ये पारित करुन घेतले व त्याकायद्यांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांनी पिढ्यांपिढ्या जपलेली शेती ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे भाड्याने घेवुन त्यांच्यावर गुलामी करण्याचे षड्यंत्र काही भांडवलदारांनी व भारत सरकारने रचले आहे. त्यांच्या विरोधात दिल्ली येथील सिंगुर बॅार्डर वर देशभरातील शेतकरी ठिय्या आंदोलन मागील १०० दिवसापासुन करत आहे तरीही केंद्र सरकारला जाग येत नाही आहे असे धनाजी बांगर यांनी व्यक्त केले. प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र एकदिवसीय उपोषण, धरणे आंदोलन आदी सुरू आहेत. त्याचा एक भाग म्हणुन मुरबाड तालुक्यांतील शेतकरी, शेतमजुर, कामगार व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी निवेदन देवुन तीव्र निषेध व्यक्त केला. जर भविष्यामध्ये तिन्ही काळे कायदे मागे घेतले नाहीत तर मुरबाड तालुक्यांतील शेतकऱ्यांवा घेवुन तीव्र आंदोलन करु असे प्रतिपादन नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी केले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...