Thursday, 25 March 2021

होळी-धूलिवंदनावर करोनाचे सावट, सार्वजनिकरित्या सण साजरा करण्यावर जिल्हा प्रशासनाचे निर्बध !!

होळी-धूलिवंदनावर करोनाचे सावट, सार्वजनिकरित्या सण साजरा करण्यावर जिल्हा प्रशासनाचे निर्बध !!


"विक्रेत्यांना चिंता"........

ठाणे : आठवडाअखेरीस येणारा होळीचा सण साजरा करण्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. मात्र करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता होळी व धुळवडीचा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यावर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत.
 
कोकणामध्ये होळी सणाला विशेष महत्त्व असून पाठोपाठ येणाऱ्या धुळवडीचा सण समाजात मोठय़ा उत्साहाने साजरा होत असतो. या सणासाठी वेगवेगळ्या गुलाल व रंगांची तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबरीने निरनिराळ्या प्रकारचे मुखवटे बाजारात उपलब्ध असून यंदाच्या सणाचे ते आकर्षण ठरणार आहे.
 
होळीचा सण २-३ दिवसांवर आला असला तरीसुद्धा सरकार कोणत्याही क्षणी टाळेबंदी जाहीर करेल या भीतीपोटी होळीच्या सणादरम्यान लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीकरिता नागरिक पुढे येऊ लागले आहेत. करोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी युवकांनी सामाजिक अंतर पाळावे व इतर र्निबधांचे  पालन करावे यासाठी उपाययोजना आखली जात आहे.

ठाणे, पालघर जिल्ह्यतील गेल्या आठवडय़ात समूहांमध्ये वावरणाऱ्या नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात आजाराचा प्रसार झाला होता. होळीदरम्यान आजाराच्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक उत्सवावर निर्बंध घातले आहेत. कार्यक्रमांस मनाई जिल्ह्य़ामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !  *शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाची कारवाई ची मागणी* नालासोपारा, प्रतिनिध...