Thursday 25 March 2021

चाचण्यांच्या प्रमाणात वाढ ; शिमगोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढल्याचा परिणाम.......

चाचण्यांच्या प्रमाणात वाढ ; शिमगोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढल्याचा परिणाम.......


ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात करोनाचा कहर वाढू लागताच प्रशासकीय यंत्रणांनी गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे.

शिमगोत्सव जवळ येऊ लागल्याने कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोकणात जाणारे प्रवासी मोठय़ा संख्येने चाचण्यांसाठी पुढाकार घेऊ लागले असून फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात चाचण्यांचे प्रमाण ७० टक्क्य़ांहून अधिक वाढले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातही आर.टी.पी.सी.आर. चाचण्यांवर भर दिला जात असून प्रतिजन चाचण्यांच्या तुलनेत या चाचण्या अधिक केल्या जात आहेत, असा दावा महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. 

जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांच्या चिंतेत भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या तातडीने चाचण्या करण्यात येत आहेत. 

मुंबई, ठाणे तसेच उपनगरातून शिमगोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना शासनाने करोना चाचणी अहवाल बंधनकारक केला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोना चाचणी केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत असून गेल्या महिन्याच्या तुलनेत ७० टक्के चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे.
 
जिल्ह्य़ात ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या हद्दीतील खासगी आणि शासकीय केंद्रांवर करोना चाचणी करण्यात येत आहे. 
त्यापैकी ठाणे महापालिका क्षेत्रात दिवसाला ४५०० ते ५००० चाचण्या होत असून दिवसाला १० टक्के करोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...