Tuesday, 23 March 2021

चिंता वाढली, राज्यात करोनामुळे ; दिवसभरात १३२ रुग्णांचा मृत्यू; २८ हजार ६९९ नवे करोनाबाधित !!

चिंता वाढली, राज्यात करोनामुळे ; दिवसभरात १३२ रुग्णांचा मृत्यू; २८ हजार ६९९ नवे करोनाबाधित !!


मुंबई : करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा कसा घालायचा? या प्रश्नावर राज्य सरकार आणि प्रशासन उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे राज्यातील करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागल्याचं चित्र दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात तब्बल १३२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब सरकारी आकडेवारीवरून समोर आली आहे. त्यामुळे करोना पुन्हा एकदा राज्यात उग्र रुप धारण करतोय की काय, अशी भिती आता आरोग्य यंत्रणांना वाटू लागली आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. तर रिकव्हरी रेट तब्ल ८८.७३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

**“लॉकडाऊन हा अंतिम पर्याय!”

राज्य सरकारने नुकतीच करोनासंदर्भात नवी नियमावली जारी केली असून त्यानुसार चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, कार्यालये या ठिकाणी ५० टक्के क्षमतेने प्रेक्षक किंवा कर्मचाऱ्यांना परवानगी असेल, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांनी देखील अनेक वेळा नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. “नियम पाळले नाहीत, तर नाईलाजाने अंतिम उपाय म्हणून लॉकडाऊनचा पर्याय असेल”, असा इशारा देखील सरकारकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वाढती *करोनाबाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा नाईलाजाने पुन्हा एकदा राज्याला किमान दोन महीन्याच्या कडक लॉकडाऊनच्या दिशेने घेऊन जाण्याची दाट शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !  *शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाची कारवाई ची मागणी* नालासोपारा, प्रतिनिध...