Monday 29 March 2021

‘शिवनेरी’कडे प्रवाशांची पाठ, मुंबई आणि पुणे मार्गावरील प्रवासी संख्येत विषाणूभयाने घट.........

‘शिवनेरी’कडे प्रवाशांची पाठ, मुंबई आणि पुणे मार्गावरील प्रवासी संख्येत विषाणूभयाने घट.........


मुंबई : मुंबईसह पुण्यात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे या दोन शहरांदरम्यान धावणाऱ्या एस.टी.च्या शिवनेरी सेवेला फटका बसत आहे. प्रवासी या सेवेकडे पाठ फिरवू लागले असून फेब्रुवारी महिन्यात प्रतिदिन असणारी २,८०० पर्यंतची प्रवासी संख्या सध्या २,४०० पर्यंत घसरली आहे. तर उत्पन्नही कमी होऊ लागले आहे. 

मुंबई आणि पुणे या दोन शहरांदरम्यान कामानिमित्त एस.टी.ने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. 
या मार्गावर एस.टी. महामंडळाच्या धावणाऱ्या शिवनेरी गाड्यांना तर शुक्रवार ते रविवार चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र करोनामुळे मार्च २०२० पासून एस.टी.च्या सेवेकडे प्रवाशांनी पाठच फिरवली. टाळेबंदीमुळे तर एस.टी. सेवाही ठप्प राहिली होती. परिणामी एसटीचे उत्पन्न बुडाले. यात शिवनेरीलाही फटका बसला होता. 

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर हळूहळू एस.टी.ची सेवा पूर्ववत झाली होती. त्यात मुंबई व पुणे शहरातील करोना रुग्णांची संख्या कमी होताच या दोन शहरांदरम्यान प्रवास करणारे प्रवासीही मिळू लागले. परंतु मार्च २०२१ पासून पुन्हा करोना रुग्णसंख्या वाढताच प्रवासी कमी होऊ लागले आहेत. 

वाढती रुग्णसंख्या व प्रवासी कमी असतानाही त्या दृष्टीने एस.टी. नियोजन करताना मात्र दिसत नाही. 

त्यामुळे खर्चही वाढत आहे. तीन महिन्यांत… जानेवारी २०२१ मध्ये ७६ शिवनेरी मुंबई ते पुणे मार्गावर धावत होत्या. प्रत्येक दिवशी एकूण २ हजार ७३० प्रवासी प्रवास करत. त्यामुळे १३ लाख ३४ हजार रुपये उत्पन्न एस.टी.ला मिळत होते. फेब्रुवारीत ७८ शिवनेरीतून दिवसाला २ हजार ८७० प्रवासी मिळू लागले. परंतु मार्च महिन्यात हीच संख्या कमी झाली. पुन्हा ७६ शिवनेरींमागे प्रत्येक दिवशी २,४०० प्रवासी प्रवास करत आहेत.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...