Monday 29 March 2021

अग्निसुरक्षेबाबत सगळीकडेच अनास्था, महाराष्ट्रातील बहुतांश आस्थापनांमध्ये अटींचा विसर ! **भंडारा आगीचा पूर्णपणे विसर.......

अग्निसुरक्षेबाबत सगळीकडेच अनास्था, महाराष्ट्रातील बहुतांश आस्थापनांमध्ये अटींचा विसर !


**भंडारा आगीचा पूर्णपणे विसर.......

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉल येथे सनराइज रुग्णालयामध्ये आग लागून शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर अग्निसुरक्षेबाबत राज्यभर सगळीकडेच अनास्था असल्याचे समोर आले आहे. 

मुंबईतील तब्बल ७६२ पेक्षा अधिक खासगी रुग्णालये व नर्सिंग होममध्ये अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना नसून कित्येक आस्थापनांना या सुरक्षेची जाणीव नाही. पुण्यामध्ये शुक्रवारी फॅशन स्ट्रीटला भीषण आग लागून शेकडो गाळे भस्मसात झाले. प्रबळ अग्निशमन यंत्रणा नसल्यामुळे यात प्रचंड नुकसान झाल्याचे उघड झाले आहे. पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात ५५ टक्के जागा रिक्त आहेत. 

इतक्या मोठ्या शहराच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी निम्म्याहून कमी मनुष्यबळावर असल्याने त्यांच्याकडून पूर्ण क्षमतेने काम कसे होईल ?, हा प्रश्न आहे. 

दोन महिन्यांपूर्वी भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा नवजात शिशूंचा होरपळून मृत्यू झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अग्निपरीक्षा व अग्निसुरक्षा व्यवस्था लागू करण्याचे आदेश दिले होते. दुर्दैवाने आरोग्य विभागाने अग्निपरीक्षण केलेल्या एकाही रुग्णालयात आजपर्यंत अग्निसुरक्षा व्यवस्था बसविण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
 
या परिस्थितीत दररोज वेगवेगळ्या शहरांत घडणाऱ्या आगीच्या दुर्घटनांत मनुष्य आणि वित्तहानी कमीत कमी करण्याचे आव्हान सर्वच पालिका यंत्रणांपुढे आहे. 
एखाद्या आंतरराष्ट्रीय शहराकडे असतात तशी सगळी यंत्रणा, अत्याधुनिक यंत्रसामग्री मुंबई अग्निशमन दलाकडे आहे.
 
मात्र एखाद्या ठिकाणी आग लागली की ती विझवायला वेळ लागला की त्याची चर्चा होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...