Sunday 28 March 2021

वाहनधारकांनो लक्ष द्या ; ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट वैधतेबाबत झाली महत्त्वाची घोषणा.........

वाहनधारकांनो लक्ष द्या ; ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट वैधतेबाबत झाली महत्त्वाची घोषणा.........
 

दिल्ली : करोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पुन्हा एकदा मूदतवाढ दिली आहे. देशातील अनेक वाहनधारकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. 

ज्या वाहन धारकांच्या वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी, पी.यु.सि. (P.U.C.) किंवा इतर कागदपत्रांची वैधता १ फेब्रुवारी २०२० ला संपली आहे 
किंवा ३१ मार्च २०२१ रोजी संपणार आहे, अशांसाठी ही मुदतवाढ आहे. 

अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वैध असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. 

गेल्या वर्षी करोनामुळे लॉकडाउन लागल्यापासून मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने अनेकदा ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या निर्णयाने ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण, वाहन योग्यता प्रमाणपत्र, पी.यू.सी. यांच्या नूतनीकरणाची चिंता भेडसावणाऱ्या अनेक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...