Sunday 21 March 2021

करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरही केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक, "डॉ शशांक जोशी"...... महाराष्ट्रात सरकारने कठोर पावले न उचलल्यास दुसरी लाट वाढेल असा इशारा डॉ. जोशी यांनी दिला.

करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतरही केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक, "डॉ शशांक जोशी"......
 
महाराष्ट्रात सरकारने कठोर पावले न उचलल्यास दुसरी लाट वाढेल असा इशारा डॉ. जोशी यांनी दिला.

 
मुंबई : महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली असतानाही केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ठोस मदत दिली जात नाही. केंद्रीय पथके राज्यात पाहणीसाठी येतात आणि ‘मास्तरां’प्रमाणे केवळ उपदेशाचे डोस पाजून निघून जातात. 

महाराष्ट्रात आज मोठ्या प्रमाणात लसीकरणाची गरज असताना पुरेशा प्रमाणात लसही पाठवली जात नाही आणि केंद्राच्या निर्बंधांमुळे सर्वांना लस देताही येत नाही, असे राज्य कृती दलाचे सदस्य, ‘कॉलेज ऑफ फिजिशियन चे डिन व ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ शशांक जोशी यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सरकारने कठोर पावले न उचलल्यास दुसरी लाट वाढेल असा इशारा डॉ. जोशी यांनी दिला.
 
“देशातील कोणत्याही अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. 
याला राज्यातील प्रमुख शहरातील लोकसंख्येच्या घनतेपासून वेगवेगळ्या राज्यातून कामासाठी येणारी लोक तसेच अनेक घटक जबाबदार आहेत. मधल्या काळात ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकांची रणधुमाळी तसेच लग्नसमारंभ आदी कार्यक्रम यातून सोशल डिस्टंसिंगचे बारा वाजणे तसेच मास्क न वापरणे आदी अनेक कारणे आहेत. 

हे सर्व लक्षात घेऊन केंद्राने महाराष्ट्रात व्यापक लसीकरण कार्यक्रम राबवायला मदत करणे अपेक्षित आहे. लस देण्याबाबतचे निर्बंध शिथिल करणे आवश्यक असल्याचे,” डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. 

“महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल पासून लोक रोजगारासाठी महाराष्ट्रात येत असतात. यात मुंबईसारख्या शहरात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून अन्य राज्यातील लोकांच्या आरोग्याच्या उपचाराचा भारही राज्य सरकार व संबंधित महापालिकांनाच उचलावा लागतो.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...