Sunday 21 March 2021

भा.ज.पा.च्या १७ नगरसेवकांवर गुन्हा...... "महापालिका सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे झाला हा गुन्हा दाखल"

भा.ज.पा.च्या १७ नगरसेवकांवर गुन्हा......

"महापालिका सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे झाला हा गुन्हा दाखल"


ठाणे : महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष सभागृहात घेण्याच्या मागणीसाठी भा.ज.पा.च्या नगरसेवकांनी पाच महिन्यांपूर्वी पालिका मुख्यालय इमारतीत आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान करोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भा.ज.पा.च्या १७ नगरसेवकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महापालिका सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला असला तरी सत्ताधारी शिवसेनेनेच ही खेळी खेळून भा.ज.पा.ला धक्का दिल्याचे बोलले जात आहे. 

ठाणे शहरात उभारण्यात येत असलेल्या तीन पादचारी पुलांच्या कामांवर आक्षेप घेत भा.ज.पा. नगरसेवक मनोहर डुम्बरे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. 
यामुळे संतापलेल्या शिवसेना नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी पालिकेतील डुम्बरे यांच्या कार्यालयात शिरून त्यांना घेराव घालून जाब विचारला होता. 

याप्रकरणी भा.ज.पा.ने केलेल्या मागणीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांसह ३० ते ४० कार्यकर्यावर गुन्हा दाखल केला होता. करोना नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. 

तर आता पालिकेचे सुरक्षारक्षक सूर्यकांत पौळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी आता भा.ज.पा.च्या १७ नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान या नगरसेवकांनी सभा ऑनलाइनऐवजी प्रत्यक्ष सभागृहात घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. 

मात्र, या आंदोलनामुळे करोना नियमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप या नगरसेवकांवर ठेवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...