Tuesday 23 March 2021

कल्याण ग्रामाण भागातील गुन्हेगारी रोखायची असेल तर नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक !!

कल्याण ग्रामाण भागातील गुन्हेगारी रोखायची असेल तर नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुका पोलीस ठाणे अतंर्गत वाढत असलेली गुन्हेगारी रोखायची असेल तर पोलिसांचा नागरिकांशी समन्वय, तरुण मंडळी, जागृत नागरिक यांची मदत अपु-या कर्मचां-याच्या परिस्थितीत अत्यावश्यक असल्याचे मत जाणकार मंडळी व्यक्त करित आहेत.                                     

कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६७ गावांचा समावेश आहे, म्हारळ, गोवेली आणि खडवली अश्या बीट चौकीच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न राखला जातो, परंतू म्हारळ पोलीस चौकीच्या हद्दीतील लोकसंख्य ४०/५० हजाराच्यावर गेली आहे, तर पोलीस ३ किंवा ४ अशीच अवस्था इतर बीट चौकींची आहे, त्यामुळे त्यातच म्हारळ चौकीच्या पोलिस अधिका-याकडे २/३ ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार ? यामुळे तर या अधिका-याला येथे बसायला वेळ नाही, किंवा आवडत नाही. याचाच फायदा काही भुरटे चोर, गल्ली दादा, भाई, घेऊ लागले आहेत ओळख व पैसा असला की आपले कोणीही काही करु शकत नाही. या फाजील आत्मविश्वासामुळे गुन्हेगारी वाढली आहे, दिवसाढवळ्या ज्यांना मिसरुड फुटले नाही अशी पोर जिवघेणी हत्यार काढून दहशत फसरवित आहेत व पोलीस दादा थोड्याश्या "आर्थिक" फायद्यापोटी यांना मोकाट सोडत आहेत, आजची परिस्थिती पाहिली तर म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा, रायते, गोवेली ही गावे गुन्हेगारांचे हाँस्पाँट होऊ पाहत आहेत, नुकतेच कांबा गावाजवळील पावशेपाडा गावातील गुंडाची लुटालूट व बिनधास्त पणे गावातून फिरणे हे सीसीटीव्हीत पाहिले की यांना पोलिसांचा धाक आहे का ? असा प्रश्न  निर्माण होतो, याबतीत पोलीसांना विचारले असता पोलिस सांगतात, आम्ही दोघं तिघ काय करणार ? खरे आहे, पण यावर उपाय देखील आहेच ना !                  

मागील पोलीस निरिक्षक व्यंकट आंधळे, बालाजी पांढरे, राजेद्र नाईक, संजय धुमाळ, गोडबोले यांच्याही कार्यकाळात पोलीस तेवढेच होते. पण यांनी जनतेचा सहभाग घेतला. जिथे पोलीस कमी पडतात तेथे नागरिकांची मदत घेतली.                                       

म्हारळ पोलिस चौकीचे इन्पेक्टर बंजरग रजपूत यांनी म्हारळ चौकीचा चार्ज घेताच, प्रथम म्हारळ, वरप, कांबा आदी गावातील चांगले तरुण,सामाजीक कार्यकर्ते, पत्रकार, वकील, यांची बैठक घेऊन आपले गाव शांत कसे राहिल, गुन्हेगारांना आळा कसा बसेल? यांचा विचार करुन या मंडळीचा एक ग्रुप बनवून कामाला लावले,याचा इतका चांगला परिणाम झाला की, रात्रीच्या गस्तीला देखील पोलीसांची गरज लागली नाही, यामुळे रात्रभर फिरणारे गर्दुले,चरशी,भुरटे चोर, टपोरी पोर, गल्लीबोळातील भाई  याच्यांवर नित्यत्रंण आले,यामुळे गुन्हेगारी थांबली व पोलिसांना थोडा 'आराम' ही मिळू लागला. पर्यायाने चो-यामा-या, हाणामा-या, कमी झाल्या.                                 
मात्र आताची परिस्थिती उलटी झाली आहे, ठाणे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने हे पत्रकांराचे फोन उचलत नाहीत, तालुक्याचे पोलिस निरिक्षक माहिती देत नाहीत, त्यामुळे पोलिसांनी काही चांगले कामे केली असतील किंवा लोकांना काही संदेश द्यायचा असेल तर तो पोहचत नाही. पर्यायाने नागरिकांमध्ये पोलिसांविषयी सहानुभूती राहत नाही.                   
म्हारळ पोलिस चोकीच्या हद्दीत वाढलेली गुन्हेगारी, कालपरवाच अगदी तरुण चोरांनी पोलिसांना दिलेले अव्हाहन, गुरवली येथील फाटका जवळील मर्डर, मुसरुड न फुटलेले 'भाई' त्यांच्याजवळ असणारी जिवघेणी शस्त्रे, पोलिसांच्या समोर होणा-या हाणामा-या, अश्या सर्व घटनांवरून या परिसरात पोलिसांचा धाक राहिला आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे हे रोखायचे असेल तर अपुरे पोलीस बळ हे तुणतूणे न वाजवता चांगल्या  नागरिकांचा "पोलिस मित्र" म्हणून सहभाग घेणे, ही काळाची गरज असल्याचे मत जाणकांर व्यक्त करतात.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...