Wednesday 28 February 2024

मराठी राजभाषा दिनी विद्यार्थांना देण्यात आली मराठी साहित्यिकांची ओळख !!

मराठी राजभाषा दिनी विद्यार्थांना देण्यात आली मराठी साहित्यिकांची ओळख !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            मराठी राजभाषा गौरव दिवस आज विद्याभवनच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे मराठीचे निवृत्त प्राध्यापक आणि आचार्य कॉलेजचे उप प्राचार्य गिरीश जोशी आणि पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. गिरीश जोशी व त्यांच्या पत्नी यांचे शाल  पुष्पगुच्छ देऊन बोऱ्हाडे यांनी सत्कार आणि स्वागत केले. विद्यार्थ्यांना मराठी साहित्यातील  साहित्यिकांची माहिती जमा करण्यास दिली होती. यामध्ये कवयित्री, लेखक, संत आणि अजरामर गाणी यांचा समावेश होता. यानिमित्त विद्यार्थ्यांना दिग्गज साहित्य व साहित्यिकांची ओळख करून देण्यात आली. यामध्ये मुक्ताबाई, संत तुकाराम, कवियत्री शांताबाई शेळके, बहिणाबाई, बालकवी आणि पु ल देशपांडे, व पु काळे याची माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली तर काही विद्यार्थ्यांनी मराठीतील गाणी आणि एकपात्री प्रयोग सादर केले. प्राध्यापक जोशी सरांनी अतिशय सोप्या व सहज मुलांना समजतील अशी मराठीतील  उदाहरणे दिली. तसेच सर्वांना आपल्या मातृभाषेचा आणि इतर भाषांचा आदर राखता आला पाहिजे. उत्तम भाषा बोलता व लिहता यावी असा मोलाचा सल्ला यावेळी देण्यात आला. राजेंद्र बोऱ्हाडे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मराठी राजभाषा दिनाचा शुभेच्छा दिल्या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन नववीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. मातृभाषा असल्यामुळे मुलांनी गाण्यावर ठेका धरला व कार्यक्रमाचा आनंद घेतला
या वेळी शाळेच्या दोन्ही माध्यमांचे मुख्याध्यापक सुनील पाटील आणि योगिनी पोतदार आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...