Wednesday 28 February 2024

राज्यातील एकूण अठ्ठावीस अधिका-या बदल्या, कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून डहाणू च्या बीडिओची नियुक्ती !

राज्यातील एकूण अठ्ठावीस अधिका-या बदल्या, कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून डहाणू च्या बीडिओची नियुक्ती !

कल्याण, (संजय कांबळे) : लोकसभा निवडणूका २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विकास सेवा, गट अ संवर्गातील गटविकास अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या असून कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी पालघर जिल्हातील डहाणू पंचायत समितीच्या बीडिओ श्रीमती पल्लवी हिंदूराव सस्ते यांची नियुक्ती करण्यात आली असून तत्कालीन गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी राबविलेली कार्यप्रणाली, यामुळे निर्माण झालेली शिस्त, कार्य तत्परता, जिल्ह्यातील अग्रक्रम कायम टिकवता येईल का? या बाबतीत साशंकता निर्माण झाली आहे.

कल्याण पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी अशोक भवारी हे त्यांच्या कार्यनिष्ठ पध्दतीमुळे ठाणे जिल्हा परिषदेत परिचित आहेत, शासनाचा आपण काम करण्यासाठी पगार घेतो, त्यामुळे काम हे करावेच लागेल अशा त्यांचा दंडक होता, माझ्या टेबलावर कागद दिसता कामा नये, असा त्यांचा नियम असल्याने जे योग्य, कायदेशीर आहे, त्यावर ताबडतोब स्वाक्षऱ्या करण्यात ते अजिबात कुचराई करत नव्हते, चे चुकीचे आहे, गैर आहे, बेकायदेशीर आहे, मग कितीही जवळच्या व्यक्ती,कर्मचारी, अथवा अधिका-याचे असलेतरी त्यावर सही ते करणार नाहीत.अशा सरळमार्गी स्वभावामुळे अनेकाची अडचण होत होती.

याशिवाय नागरिकांच्या तक्रारी, मोर्चे, प्रश्न, अडचणी, समस्या, उपोषण आदी बाबतीत जे शक्य आहे ते तात्काळ करण्याचे ते आदेश देत होते, त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात कल्याण पंचायत समिती वर मोर्चे, उपोषण, घेराव, अशी अंदोलने झाली नाहीत, यामुळे त्यांची प्रशासनावर किती मजबूत पक्कड, ग्रामसेवक, कर्मचारी यांच्या कडून काम करून घेण्याची हातोटी, कामचुकार व बेशिस्त कर्मचाऱ्यांना नोटीस, प्रंसगी निंलबनाचा प्रस्ताव पाठविण्यात त्यांनी कधी चालढकल केली नाही. त्यामुळे कल्याण पंचायत समितीचे अधिकारी, व कर्मचारी यांच्या मनात बीडिओ चा दबदबा होता.

या सर्वाचा परिणाम म्हणून कल्याण पंचायत समिती, स्वच्छता अभियान, जलजीवन मिशन, रमाई, शबरी, मोदी, आवास योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, याशिवाय शासनाचे विविध उपक्रम, अहवाल, त्यांची अमंलबजावणी,यामध्ये पंचायत समिती जिल्ह्यात नेहमीच आघाडीवर राहिली होती.
हे करत असताना त्यांनी कधीही कौटुंबिक अडचणी, आजारपण, अथवा तत्सम बाबींचा बाहू केला नाही. त्याचाच परिणाम आज कल्याण पंचायत समिती एक आदर्श पंचायत समिती म्हणजे नावारूपाला आली आहे. अशातच त्यांची बदली नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पंचायत समिती येथे झाली आहे, त्यांच्या रिक्त पदी पालघर जिल्ह्यातील डहाणू पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीम, पल्लवी हिंदूराव सस्ते यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय राज्यातील एकूण २८ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये डहाणू,  वाडा, तलासरी, कोपरगाव, जुन्नर, माण, वाई, खंडाळा, खटाव, अक्कलकोट, हातकणंगले, कडेगाव, शेगाव, खामगाव, वरुड, वैजापूर, आदी पंचायत समित्याचा समावेश आहे.

त्यामुळे नवीन गटविकास अधिकारी श्रीमती सस्ते मँडम या कल्याण पंचायत समितीचा  हा शिस्तबद्ध डोलारा कश्या सांभाळतात हे लवकर कळेल.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...