Wednesday 28 February 2024

महर्षी दयानंद कॉलेज कला विभाग बॅच -१९८७-८९ चे चौथे स्नेहसंमेलन खेळीमेळीच्या वातावरणात साजरे !!

महर्षी दयानंद कॉलेज कला विभाग बॅच -१९८७-८९ चे चौथे स्नेहसंमेलन खेळीमेळीच्या वातावरणात साजरे !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
              महर्षी दयानंद कॉलेज कला विभाग बॅच-१९८७-८९ चे चौथे स्नेहसंमेलन खेळीमेळीच्या वातावरणात रविवारी (२५फेब्रुवारी) चिंचपोकळी निर्मल हॉल येथे खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात साजरे झाले. सहकुटुंब सहपरिवार घेऊन प्रत्येक माजी विद्यार्थी आवर्जू उपस्थित होता. यावेळी करवोके गाण्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यानी आपली गाण्याची कला सादर केली. काहींच्या मुलांनी पण गाणी आणि नृत्य सादर केली. यामध्ये हरी मरतल, प्रकाश जाधव, किरण तळेकर, आदेश म्हात्रे, तनिष्क तळेकर, सुहास सावंत, मिलिंद शेट्ये यांनी सदाबहार गीते सादर केली.तर तनया गावडे हिने राम जन्म भूमीवर आधारित भरत नाट्य चे सुंदर नृत्य सादर केले.कविता मिठे हिने देखील हिंदी गीतावर तिच्या सासूसह बहारदार नृत्य केले. यानिमित्ताने अनेकांनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणी शेअर केल्या.आलेल्या विद्यार्थीमध्ये काही व्यावसायिक, पेशाने वकील, तर काही पोलिस अधिकारी तर काही सरकारी सेवेत होते. सर्वात शेवटी सगळ्यांनी सैराट या  गीतावर नृत्य करून मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भाटकर, आदेश म्हात्रे आणि वंदना गावडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रुप अडमिंन सुनील पांचाळ, मिलिंद गावडे, किरण तळेकर, नंदू कदम यांनी विशेष मेहनत घेतली. मनीषा फाळके आणि रंजना बिरमुळे यांनी सर्वात शेवटी उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थी वर्गाचे आभार मानले. सर्वात शेवटी स्नेहभोजन करून सर्वांनी आठवणींची शिदोरी सोबत घेऊन पुन्हा एकदा भेटू असा निरोप घेऊन कार्यक्रमची सांगता केली.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...