Wednesday 28 February 2024

जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर !!

जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर !!

रायगड, प्रतिनिधी -  महाराष्ट्र शासन-कृषी विभाग यांच्यामार्फत कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, पत्रकार, संस्था अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रतिवर्षी कृषी पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन 2020, 2021, 2022 वर्षासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी दिली आहे. 

कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, पत्रकार, संस्था अधिकारी आणि कर्मचारी यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट/ आदिवासी गट), पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार असे विविध पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. या पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. 

राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत__

सन-2020- वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, डॉ.श्री.मकरंद अरविंद आठवले, मु.पो.नागांव ता.अलिबाग जि.रायगड. युवा शेतकरी पुरस्कार- कुमारी रसिका अनिल फाटक, मु.कोलाथरे पो.दहिगाव ता.सुधागड पाली, जि.रायगड. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार- श्री.धनंजय मधुकर जोशी, मु.नारळी जोशीबाग, पो.घोसाळे, ता.रोहा जि.रायगड.

सन -2021- वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, श्री. प्रकाश शांताराम ठाकूर, मु.पो.नागाव, ता.उरण जि.रायगड. कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, श्री.संतोष काशिनाथ दिवकर, मु.पो.यशवंतखार, ता.रोहा जि.रायगड. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, श्री.सज्जन गोवर्धन पवार, मु.कानपोली, पो.पडघे, ता.पनवेल, जि.रायगड. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार श्री.धाया हिरा भला, मु.शेडाशी, पो.रानसई, ता.पेण, जि.रायगड.

सन-2022- जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, श्रीमती प्राची विजय शेपूंडे, मु.कुडली, पो.जामगाव, ता.रोहा, जि.रायगड. कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, श्री.अनंत दत्तात्रेय भोईर, मु.टेमघर पो.चणेरा ता.रोहा जि.रायगड. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, प्रफुल्ल काळुराम खारपाटील, मु.पो.चिरनेर ता.उरण जि.रायगड

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...