Wednesday 28 February 2024

ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे काम करतात - ॲड श्रीमती सुनीता जोशी

ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे काम करतात - ॲड श्रीमती सुनीता जोशी

** ग्रंथ पूजन करून ग्रंथोत्सव 2023 चे उद्घाटन

रायगड, प्रतिनिधी -  ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे व समाजाला सुधारण्याचे  काम करतात, असे प्रतिपादन ॲड. सुनीता जोशी यांनी केले. सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, डोंगरे हॉल, अलिबाग येथे ग्रंथोत्सव 2023 च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी मुख्य प्रशासकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, डॉ.हेमंत पवार, सार्वजनिक वाचनालय, अलिबाग, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलाताई पाटील, रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोदार्डे, श्री.वणगे, रायगड जिल्हा ग्रंथालय सदस्य नागेश कुलकर्णी, श्री.रमेश धनावडे आदि उपस्थित होते.

यावेळी मागदर्शन करताना ॲड.जोशी म्हणाल्या की, ग्रंथ हे गुरु, मित्र, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका बजावत असतात. काय वाचावं, किती वाचावं यामुळे वाचक भरकटतो आहे, त्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. स्वतःला अद्यावत ठेवणे, स्पर्धेत टिकून रहाणे यासाठी वाचनाला पर्याय नाही. वाचनामुळे विचारात प्रगल्भता येते. नवे विचार मांडून समाजाला दिशा देणे हे ग्रंथाचे काम आहे. मोठ्यांची चरित्र आपल्याला प्रेरणा देतात. ग्रंथ स्वीकारणे किंवा नाकारणे हे सर्वस्वी वाचकावर अवलंबून आहे. गावातली माणसे कोणते ग्रंथ वाचतात, तेथील ग्रंथालये किती समृद्ध आहेत यावरून गावाची समृद्धी मोजली जाते. वाचनातून व्यापक जीवनदर्शन होत राहते. सर्वकष वाचन हे आत्मशोध घेण्यास प्रवृत्त करते. आपल्या ज्ञानाचा आवाका विस्तारते, तर संतसाहित्य निरामय आनंदाचा मार्ग दाखवते असेही त्या म्हणाल्या.

यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्तावित व आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व  राज्यगीताने झाली.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...