श्री देव केदारलिंग युवा स्पोर्ट्स क्लब मारळ आयोजित मार्लेश्वर पंचक्रोशी मर्यादित केदारलिंग चषक -२०२४ चे राजकोजी क्रिकेट संघ रेवाळेवाडी आंगवली ठरला मानकरी !!
*एन्जॉय आंगवली संघ ठरला उपविजेता*
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
श्री केदारलिंग चषक -२०२४ ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी नालासोपारा पश्चिम डम्पिंग मैदान येथे पार पडली. स्पर्धा उद्घाटन मारळ गावचे सुपुत्र विरार भागात शिवसेनेचे शाखाप्रमुख असलेले श्री.नितेश पांडुरंग गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन शुभ क्षणी मारळ गावातील जवळजवळ ५० मुलांनी आपली उपस्थिती दाखवली. या स्पर्धेसाठी काही संघ आणि काही खेळाडू गालावरून देखील या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीत लढत एंजॉय आंगवली आणि राजकोजी क्रिकेट संघामध्ये झाली. तत्पूर्वी अंतिम सामन्याची लॉटरी एन्जॉय संघाला लागली आणि दुसऱ्या सेमी फायनल मध्ये संघर्ष हातीव विरुद्ध झालेल्या सामन्यात राजकोजी संघाने विजयश्री खेचून आणला. अंतिम सामन्यात देखील राजकोजी संघाने जबरदस्त कामगिरी करत केदारलिंग चषक -२०२४ वर आपले नाव कोरले. एन्जॉय आंगवली संघाला उपविजेतेपदावर आणि संघर्ष हातीव संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. मालिकावीर विशाल जाधव तर उत्कृष्ट गोलंदाज संकेत रेवाळे (दोन्ही राजकोजी संघांचे ) उत्कृष्ट फलंदाज प्रणित मांडवकर यांना चषक देऊन गौरविण्यात आले दरम्यान या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्ती श्री. निलेश सुरेश कदम यांच्यातर्फे तिन्ही चषक देण्यात आले.
मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज चषक श्री नितेश पांडुरंग गुरव यांच्यातर्फे देण्यात आले. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी संघांसाठी विशेष सन्मानचिन्ह प्रमोद रमाकांत धावडे यांच्यातर्फे देण्यात आले. आर्थिक सहकार्य सढळ हस्ते करणारे श्री. प्रशांतजी यादव अध्यक्ष वाशिष्ठी मिल्क प्रॉडक्टस प्रा. लि. नेते राष्ट्रवादी काँग्रेस, विकास झंजाड, भाजपा नगरसेवक श्री.मंगेश शंकर धावडे, विश्वास शामराव सावंत, संतोष अनंत गुरव, प्रशांत खानविलकर यांचे देखील आभार सूत्रसंचालन करते वेळी मानले गेले. चेंडूची व्यवस्था ओमकार शिवाजी गुरव यांचे मामाश्री यांनी केले त्याबद्दल त्यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाचे विशेष आभार या स्पर्धेमध्ये सर्वात लहान खेळाडू कु. जय दिनेश गुरव याने सहभाग घेऊन भविष्यातील क्रिकेटचा वारसा आम्ही नक्की चालवू असा संकेत दिला. स्पर्धेसाठी विशेष चित्रीकरण सह्याद्री कोकण युट्युब चॅनेलचे ब्लॉगर दिनेश गुरव यांनी केल्याबद्दल त्यांचे आभार, स्पर्धेतील फोटोग्राफी जबाबदारी रितिक रवींद्र गोरुले यांनी पार पाडली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून कामगिरी करणाऱ्या सर्व पंच स्कोरर आणि मैदानातील आणि मैदानाबाहेरील व्यवस्थापन करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.कोणताही कार्यक्रम म्हटलं कि स्वयंसेवक यांना अल्पोपहार महत्वाचा परंतु अल्पोपहार न देता कमिटी साठी पोटभर जेवणाची सोय रुपेश रवींद्र सुवारे यांनी केली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
श्री देव केदारलिंग युवा स्पोर्ट्स क्लब मारळ आयोजित मार्लेश्वर पंचक्रोशी मर्यादित केदारलिंग चषक -२०२४ चे राजकोजी क्रिकेट संघ रेवाळेवाडी आंगवली मानकरी ठरल्याबद्दल संघाचे अनेकांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment