रुग्णांसाठी कार्य करणाऱ्या देवदुतांचा सन्मान !!
*वैद्यकीय मदत कक्षाच्या तिसऱ्या वर्धापन दिनी गौरव*
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
ग्रामीण भागातील अपघात ग्रस्त रुग्णांना शहरातील रुग्णालयात तातडीने मदत व्हावी यासाठी तीन वर्षापूर्वी मुंबईत स्थापित केलेल्या वैद्यकीय मदत कक्षातील देवदूतांचा सन्मान आज दादर येथील कल्चरल सेंटर हॉल येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. वैद्यकीय मदत कक्षाच्या संस्थापक अध्यक्ष कृष्णा मारुती कदम यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या वर्धापन दिनाच्या सन्मान सोहळा कार्यक्रमात उद्योजक किसन भोसले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते राजन भिसे, शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या स्नेहल जगताप, धनंजय पवार, संजय कदम, नायर रुग्णालयाचे डॉ सुधीर मेढेकर, मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मानवतेचे देवदूत - डॉ सुधीर मेढेकर
वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देवदुतांच्या सन्मान कार्यक्रमात नायर रुग्णालयचे अधिष्ठाता डॉ सुधीर मेढेकर यांनी कक्षाच्या कार्यकर्त्यांना मानवतेचे देवदूत अशी उपमा देत त्यांचा शाब्दिक गौरव केला. ते म्हणाले की नायर रुग्णालय हे अव्वल दर्जाचं रुग्णालय असून आतापर्यंत शासनाच्या सर्व योजनांचा अधिक लाभ नागरिकांना मिळवून देण्याचा आम्ही लाभ दिला आहे. कोकणच्या महामार्गावर अपघात होतात तिथेही आम्ही प्राथमिक उपचार रुग्णाला कसे मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न सुरू करत असल्याचे डॉ. सुधीर मेढेकर म्हणाले.
प्राथमिक उपचारासाठी हॉस्पिटल असणे आवश्यक - राजन भिसे, अभिनेते
मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. रस्ता एकदा मोठा झाला की रस्त्यावर अपघात घडण्याचे प्रकार वाढत आहे. मुंबई गोवा महामार्गावर हे प्रमाण खूप आहे. मी देखील मुरुड जंजिरा मधला.. कोकणात काय परिस्थिती आहे आम्ही डोळ्यांनी पाहतो आहे. वैद्यकीय मदत कक्षाच्या ग्रुप ची मागणी रास्त आहे. रुग्णाला प्राथमिक उपचार मिळण्यासाठी त्या मार्गावर हॉस्पिटल असणे आवश्यक असल्याचे अभिनेते राजन भिसे यांनी मत व्यक्त करताना केले.
दोन वर्षात हॉस्पिटल बांधण्यासाठी प्रयत्न करणार - उद्योजक किसन भोसले
गेली तीन वर्ष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून कोकणातील तरुण मंडळी एकत्र येईल वैद्यकीय क्षेत्रासाठी कार्य करत आहे. मुंबई गोवा महामार्गावर प्राथमिक उपचार करिता हॉस्पिटल असावं अशी मागणी होत आहे . दोन वर्षात आम्ही हॉस्पिटल बांधण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास किसन भोसले यांनी व्यक्त केला. तर यावेळी शिवसेनेच्या स्नेहल जगताप यांनी देखील हॉस्पिटल साठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले तर त्यांचे वडील दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले.
No comments:
Post a Comment