म्हारळ ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ मेघा मोरे हिचा सत्कार, वडिलांचा कोरोनामुळे मृत्यूनंतरही मिळवले यश !
कल्याण, (संजय कांबळे) : ऐन परीक्षा काळात वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, एकुलती एक असलेली मुलगी व आईवर दु:खाचा डोंगर कोसळला, मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती, भयंकर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास व परिस्थितीची जाणीव या गुणांच्या जोरावर म्हारळ गावातील मोहन नगरी येथे राहणाऱ्या कु मेघा राजू मोरे हिने वैद्यकीय पदवी प्राप्त करून उज्ज्वल यश प्राप्त केल्यामुळे म्हारळ ग्रामपंचायतीच्या उच्च शिक्षित सरपंच सौ निलिमा नंदू म्हात्रे यांनी आज तिचा कार्यालयात शाल श्रीफळ व पुष्पगुष्ष देऊन तिचा सत्कार केला, यावेळी म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी केलेल्या सहकार्याबद्दल डॉ मेघा मोरे हिने सर्वाचे आभार मानले.
म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील मोहन नगरी येथे राहणारे राजू मोरे हे पालघर येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत होते, मात्र कर्तव्यावर असतानाच १३ आँगस्ट २०२० रोजी त्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. आई सरिता मोरे यांच्या वरतर दु:खाचा डोंगर कोसळला, कारण त्यांना मेघा ही एकुलती एक मुलगीच होती, त्यातच तिचा धुळे जिल्ह्यातील दादासाहेब स्वरुपसिंह नाईक आयुर्वेदिक कॉलेजला नंबर लागला होता, नेमके परिक्षाच्या काळात अशी दु:खद घटना घडल्यामुळे मेघाला खूप मोठा धक्का बसला होता. पण दुसऱ्याच क्षणी तिला तिच्या बापाला दिलेले वचन आठवले, तिने तिच्या वडिलांना मी डाँक्टर होणार असे वचन दिले होते, आणि ते पुर्ण करण्यासाठी तिथे अशा बिकट परिस्थितीत बीए एम एस ची परीक्षा दिली व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली,
तिला या काळात काही कागदपत्रांची अंत्यंत आवश्यकता असतानाच म्हारळ ग्रामपंचायतीच्या सदस्यां श्रीमती मंगला सिध्दार्थ इंगळे यांनी मेघाला सरपंच सौ निलिमा म्हात्रे यांच्या कडे आणले, सरपंच स्वतः उच्चशिक्षित असल्याने मेघाच्या कागदपत्रांची तत्परतेने पुर्तता करून त्यावर स्वाक्षऱ्या केल्या, याचा फायदा तिला कल्याण येथील प्रसिद्ध सिटी केअर हास्पिटल मध्ये डॉक्टर म्हणून नियुक्ती झाली.
त्यामुळे म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील मुलगी डॉक्टर झाली व हे गावासाठी अभिमानाची बाब आहे म्हणून डॉ मेघा मोरे हिचा सरपंच निलिमा नंदू म्हात्रे, यांनी शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, याप्रसंगी सदस्यां मंगला इंगळे, ग्रामसेवक नितीन चव्हाण, डॉ मेघाची आई सरिता मोरे, सामाजिक कार्यकर्ते नंदू म्हात्रे, वसत शेलवलीचे माजी सरपंच मधू राणे, पत्रकार संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी आपल्याला अडचणीच्या काळात सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामसेवक नितीन चव्हाण यांनी सहकार्य केल्याबद्दल डॉ मेघा मोरे हिने सर्वाचे आभार मानले.
No comments:
Post a Comment