Monday, 26 February 2024

कासार कोळवण बावनदी पूल व्हावा म्हणून उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना ग्रामस्थांचे निवेदन !!

कासार कोळवण बावनदी पूल व्हावा म्हणून उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना ग्रामस्थांचे निवेदन !!

*सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रवींद्र चव्हाण व पालकमंत्री मा. उदय सामंत यांची भेट घेऊन दिला विनंती प्रस्ताव*

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख पासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु. पो. कासार कोळवण गाव हे दुर्गम भागात असून सर्व पंचक्रोशीतील लोकांना हा अगदी मोक्याचा मार्ग सुरळीत होईल म्हणून गेली अनेक वर्ष सर्वजण प्रयत्न करीत असलेल्या बावनदीवरील कासार कोळवण येथे आवश्यकता असलेल्या पूलासाठी आज (दि.२६ फेब्रुवारी) विधान भवन मध्ये ग्रामपंचायत सरपंच सौ. मानशी महेंद्र करंबेळे, पो.पाटील महेंद्र रामचंद करंबेळे व उपसरपंच प्रकाश धोंडू तोरस्कर यांनी चिपळूण संगमेश्वर मतदार संघांचे आमदार शेखर निकम यांचे समवेत पूलाचे काम मार्गी लागावे यासाठी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. 

            सदर भेटीमध्ये त्यांनी सांगितले की, आम्ही हा ग्रामस्थचा गंभीर व ज्वलंत प्रश्न लवकरच निकाली काढू असे आश्वासन दिले आहे. सोबतच मा. मंत्री सार्वजनीक बांधकाम श्री. रविंद्रजी चव्हाण व उद्याेगमंत्री तथा पालकमंत्री मा. उदय सामंत यांनाही निवेदने दिली असून लवकरच पूलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करू असे सांगण्यात आले. 

           हा पूल झाला तर कासार कोळवण गावासह वांझोळे, सुतारवाडी, सनगलेवाडी आदी गाव, वाड्या यांना फायदा होणार आहे. कासारकोळवण या गावातील लोकांना देवरुख येथे जाणाऱ्या एस.टी साठी किंवा मुंबईला येण्यासाठी कासारकोळवण एस.टी स्टाँप वर याच पुलाचा वापर करावा लागतो. तसेच शेती कामाला किंवा एखाद्या रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणे/आणणे शिवाय जनता विद्यालय आंगवली या शाळेत इ.८ वी १० पर्यंत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी वर्गालाही याच पूलाचा वापर करावा लागत असल्यामुळे येथे पूल होणे आवश्यक आहे. याठिकाणी पूल झाल्यास कासार कोळवण सह पंचक्रोशीतील नव्हे तर तालुक्यातील ग्रामस्थांची गैरसोय दूर होईल. पर्यायाने गाव व तालुक्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल. उद्योगांना चालना मिळेल. तरी हा पूल त्वरीत बांधावा अशीच मागणी स्थानिकांसह पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत.

No comments:

Post a Comment

सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌" !!

"सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌" !! पिपल्स एज्युकेशन सोसाय...