वरप येथे जांभूळ बिटाचा महिला मेळावा संपन्न, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ दिडिंने सुरुवात, मदतनीसांच्या लेझीम ने रंगत वाढली !
कल्याण, (संजय कांबळे) : महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद ठाणे, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कल्याण आयोजित, पंचायत राज संस्था मधील महिला लोकप्रतिनिधी प्रशिक्षण महिला मेळावा प्रशिक्षण केंद्र जांभूळ बिटाचा मेळावा वरप येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती, यामध्ये अंगणवाडी च्या मदतनीस यांनी लेझीम सादर केल्याने कार्यक्रमात रंगत वाढली होती.
आजच्या या महिला मेळाव्याला वरप ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती छाया महेंद्र भोईर, उपसरपंच मीना कुर्ले, म्हारळ ग्रामपंचायतीच्या माझी उपसरपंच अश्विनी देशमुख, सदस्यां विदेका गंभीरराव, लक्ष्मण कोंगिरे तसेच आणे भिसोळ, जांभूळ वसत, येथील सरपंच, सदस्य, डॉ श्रीमती इंगळे मँडम, अँडव्होकेट, तसेच कल्याण पंचायत समितीच्या बालविकास विभागाच्या श्रीमती उषा लांडगे, घरत मँडम, तसेच या बिटाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक या बिटाच्या प्रमुख निपुर्ते मँडम यांनी केले, या मेळावा घेण्यामाचा उद्देश, हेतू त्यांनी सांगितला, प्रारंभी आज मराठी भाषा गौरव दिन असल्याने ग्रंथ दिंडी काढण्यात आली, यावेळी अंगणवाडी मदतनीस यांनी लेझीम सादर केले, यामध्ये शाळेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थितीत पाहुण्याकडून सेविका व मदतनीस यांनी बनवलेल्या विविध रेसीपी व साहित्य, कलाकृती याची पाहणी करून त्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात येवून पाहण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या मध्यावर महिला मेळावा असे लिहिलेला केक कापण्यात आला.
या मेळाव्यात महिलांना कायदेविषयक, आरोग्याविषयी तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच काही सेविका यांनी लेख वाचवा, शासनाच्या विविध योजना याची माहिती नाट्यमय रुपात दिली.
अखेरीस आलेल्या सर्व सेविका, मदतनीस तसेच पाहुणे, ग्रामस्थ यांना चविष्ट भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जांभूळ बिटातील विशेष करून वरप, कांबा, म्हारळ येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी खूप मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment