Tuesday 5 March 2024

कोकण समाज भूषण पुरस्काराने कृष्णा कदम सन्मानित !!

कोकण समाज भूषण पुरस्काराने कृष्णा कदम सन्मानित !!

*उद्योगमंत्री उदय सामंत, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण*

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

          ग्रामीण तसेच दुर्गम भागातील सामान्य रुग्णांना शहरातील रुग्णालयात उपचार मिळावे, तातडीची मदत व्हावी याकरिता वैद्यकीय मदत कक्षा तर्फे सामाजिक कार्य करणाऱ्या मुंबईतील ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा मारुती कदम यांना कोकण समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे, गणेश नगर, मुक्ताई गार्डन येथे कोकण रहिवाशी समाज संघाच्या वतीने कोकणवासीयांच्या महामेळाव्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णा कदम यांना पुरस्कार सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार भरत गोगावले, नगरसेवक काकासाहेब पवार, कोकण रहिवाशी समाज संघाचे अध्यक्ष प्रकाश यादव, कार्याध्यक्ष सुनील मोरे, सचिव लक्ष्मण कदम हे देखील उपस्थित होते.
         कोरोना महमारीत रुग्णाचे झालेले हाल लक्ष्यात घेऊन कदम यांनी तीन वर्षापूर्वी ग्रामीण भागातून शहरात उपचार करिता येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात मदत व्हावी यासाठी वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली. वैद्यकीय मदत कक्षाच्या व्हॉट्स अप्स ग्रुप बनवत यात ८०० हून अधिक सदस्य यात डॉक्टर, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, वार्ड बॉय, रक्तदाते, मेडिकल संबधित विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र आणत वैद्यकीय कार्यासाठी जोडले. तीन वर्षात हजारहून अधिक रुग्णांना या कक्षाची मदत मिळाली असून ७० हून अधिक दिव्यांगना चेअर स्ट्रेचर तर ६० पेक्षा जास्त महिला आणि पुरुषाचे मोफत मोतीबिंदू चे ऑपरेशन करण्यात आले आहे. कृष्णा कदम यांचे व त्यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याची दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत कृष्णा कदम यांना कोकण समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मदत कार्यासाठी शेकडो हात एकत्र आल्याने रुग्णांना मदत देणे शक्य होत आहे. मुंबई गोवा महामार्गावर अपघात ग्रस्त रुग्णांना तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार करिता रुग्णालय व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. मिळणार पुरस्कार ही आमच्यासाठी शाब्बासकी आहे आणि हा पुरस्कार माझ्या वैद्यकीय मदत कक्षात कार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर , कर्मचारी , कार्यकर्ते यांना समर्पित करत आहे असे संस्थेचे अध्यक्ष कृष्णा कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...