पत्नीला नांदवायला पाठवत नसल्याने वाद,पतीची गळफास घेऊन आत्महत्या.
वाकड,पुणे - कौटुंबिक कलहातून एका व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना आज (दि.१५) सकाळी उघडकीस आली.
शिवाजी भिकाजी सोरटे (वय ५५, रा. एकता कॉलनी, डांगेचौक, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शिवाजी सोरटे यांचा सासरच्या लोकांशी वाद सुरु होता. शिवाजी यांच्या सासरचे लोक त्यांच्या बायकोला नांदावायला पाठवत नसल्याने शिवाजी आणि सासरच्या लोकांमध्ये मागील आठवड्यात ८ जून रोजी भांडण झाले होते.
या भांडणात शिवाजी यांनी त्यांचे सासरे, मेहुणा आणि मेहुण्याच्या पुतण्यावर कोयत्याने वार केले होते. याबाबत त्यांचा मेहुणा बाजीराव बबन ओझरकर (वय ३२, रा. ओझरकरवाडी, माण, ता. मुळशी) यांनी मंगळवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या वादानंतर शिवाजी हे नैराश्यात होते. रविवारी रात्री त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस तपास करीत आहेत.

No comments:
Post a Comment