Thursday, 13 August 2020

कल्याण तालुक्यातील खडवली बेहरे ग्रामपंचायत येथून गंदगी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ !!

कल्याण तालुक्यातील खडवली बेहरे ग्रामपंचायत येथून गंदगी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ !!


कल्याण (संजय कांबळे) : ठाणे जिल्ह्या परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गंदगी मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ आज कल्याण तालुक्यातील खडवली बेहरे ग्रामपंचायत येथून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुषमा लोणे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सिसोदिया मॅडम यांच्या उपस्थितीत झाला.


यावेळी कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे, माझी सभापती दर्शना जाधव, खडवली बेहरे ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती रोहिणी जाधव, उपसरपंच योगेश मोकाशी, ग्रामसेवक तूषार पाटील उपस्थित होते.


यावेळी झेडपी अध्यक्षा सुषमा लोणे आपल्या भाषणात म्हणाल्या 'हे अभियान खेडोपाड्यात व प्रत्येक नागरिका पर्यत पोहचले पाहिजे यांचा शुभारंभ माझ्या झेडपी गटातून होतो आहे यांचा मला विशेष आनंद झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच माझ्या रुपाने कल्याण तालुक्याला जिल्हा पातळीवर नेतृत्व लाभले आहे त्यामुळे तालुक्यातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून तालुक्यात 50 लाखांची कामे प्रस्तावित केली असल्याचे सांगितले तसेच कोरोनोच्या वाढत्या काळात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. 
गंदगी मुक्त भारत अभियानाचे संपर्क प्रमुख अतुल केणे यांनी या अभियाना विषयी माहिती देताना सांगितले की हे अभियान भारत, राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगून सर्वाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
 तर जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी श्रीमती सिसोदिया मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ८आॅगस्ट ते १५ आॅगस्ट पर्यत हे अभियान राबविण्यात येणार आहे. आपण सुरवातीपासून हात साबणाने धुण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांगत होतो. आता कोरोनोच्या संकटात फक्त सॅनिटायझर व मास्क चा वापर वाढला आहे. त्यामुळे आपण लढलो पाहिजे कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे. भारतीयांची प्रतिकार शक्ती चांगली आहे, आरोग्य व स्वच्छता यांचा खूप जवळचा संबंध आहे असे बोलून या अभियानात वृक्षारोपण, कार्यालयाची स्वच्छता, परिसर स्वच्छता प्रभावी पुणे राबविण्याच्या सूचना दिल्या.
तर गटविकास अधिकारी श्वेता पालवे या मार्गदर्शन करताना म्हणाल्या, आरोग्याची पहिली पायरी स्वच्छता आहे. त्यामुळे गावाला स्वतः चे घर समजा म्हणजे परिसर आपोआप स्वच्छ होईल, मनाची स्वच्छता महत्त्वाची आहे. शासनाच्या निर्देशानुसार हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोनोच्या प्रारंभीच्या काळात ग्रामपंचायतीनी कम्युनिटी किचन अंत्यत चांगल्याप्रकारे राबवली व एकालाही उपाशी ठेवले नाही. असे सांगून ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक केले. तसेच पंचायत समिती कडून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी सभापती दर्शना जाधव यांनी देखील भाषण केले. यावेळी विस्तार अधिकारी श्रीमती विशाखा परटोळे, एस बी एम चे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय जाधव, वैभव दलाल, प्रकाश मढवी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!  ***    १०५ हुतात्म्यांना मानवंदना; स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध का...