Wednesday 19 January 2022

भिवंडी -कोपर ग्रामपंचायत उप -सरपंच पदी सौ.हेमा म्हात्रे यांची बिन विरोध निवड !!

भिवंडी -कोपर ग्रामपंचायत उप -सरपंच पदी सौ.हेमा म्हात्रे यांची बिन विरोध निवड !!


भिवंडी, दिं,19, अरुण पाटील (कोपर) :
           भिवंडी तालुक्यातील सधन समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायती पैकी कोपर ग्रामपंचायतिच्या उप सरपंच पदाची निवडणूक आज (दिं,19) रोजी संपन्न झाली.या निवडणुकीत सौ. हेमा म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
          श्री. भारत पाटील यांनी आपल्या उप सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त पदासाठी आज दुपारी निवडणूक घेण्यात आली होती. या वेळी उप -सरपंच पदासाठी सौ. हेमा विनायक म्हात्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच तथा निवडणूक पीठासीन अधिकारी श्री. रमेश सीताराम पाटील यांनी सौ. हेमा म्हात्रे या बिन विरोध निवडून आल्याचे घोषित केले.
            या वेळी उपस्थित ग्रामस्थ व ग्राम  पंचायत कमिटीने पुष्प गुच्छ देऊन टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ग्रामसेवक श्री. गणेश जाधव, वरिष्ठ लिपिक श्री. विनेश पाटील,ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते.
         ( फोटोत --सौ. हेमा म्हात्रे यांचे अभिनंदन करताना सरपंच श्री. रमेश पाटील व ग्रामसेवक श्री. गणेश जाधव )

No comments:

Post a Comment

मतदारसंघांतील गेल्या दहा वर्षातील महायुतीची विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा - श्रीकांत शिंदे

मतदारसंघांतील गेल्या दहा वर्षातील महायुतीची विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा - श्रीकांत शिंदे  डोंबिवली, सचिन बुटाला : कल्याण पू...