Saturday 17 December 2022

वसंत संखे यांच्या "दिव्यांगांचा दिपस्तंभ " या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न !

वसंत संखे यांच्या "दिव्यांगांचा दिपस्तंभ " या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
           "दिव्यांगांचा दिपस्तंभ " या  श्री वसंत संखे लिखीत व मनाली प्रकाशन यांनी प्रकाशीत केलेल्या  पुस्तकाचे विमोचन  बोरीवली येथील प्रबोधनकार  ठाकरे नाट्य सभागृहात  वसई विरार महानगर पालिकेचे प्रथम महापौर श्री राजीवजी पाटील यांच्या  हस्ते  शनिवारी दिमाखात संपन्न झाले. 
           या वेळी मुंबई काँग्रेसचे खजिनदार श्री. भूषण पाटील, मुंबई विद्यापीठाचे  माजी प्र. कुलगुरू श्री अरूण सावंत आणि  महाराष्ट्र शासनाचे माजी संचालक,   माहिती व जनसंपर्क श्री  देवेंद्र भुजबळ उपस्थीत होते.या प्रसंगी बोलताना श्री. राजीव पाटील म्हणाले की प्रतिकूल परिस्थीतीवर मात करण्याची जिद्द वसंत संखे कडून घेण्यासारखी आहे.श्री.भूषण पाटील यांनी नमूद केले की अपंगाच्या क्षेत्रात काम करतानाच  अन्य सामाजिक कार्यात देखील  श्री वसंत संखे  पुढाकार घेत असतात. श्री अरूण सावंत यांनी भिवंडी येथील महाविद्यालयात श्री वसंत सखे बरोबर शिकत असतानाच्या  आठवणींना उजाळा दिला. श्री देवेद्र भुजबळ यांनी सांगीतले की  हे पुस्तक दिव्यागांसाठीच  नाही तर सर्वांसाठीच  दिपस्तंभ राहिल त्यामुळे  या पुस्तकाचे अन्य भाषेत सुद्धा  भाषांतर झाले पाहिजे. तसेच   या पुस्तकाच्या आधारे एखाद्या  उत्तम चित्रपटाची  देखील निर्मिती होऊ शकते.या पुस्तकाच्या  प्रकाशनाचे औचित्य साधून अपंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या व  अलिकडे राष्ट्रपती  व अन्य पुरस्कार मिळालेल्या  काही दिव्यांगांचा सत्कार  वसंत संखे यांच्या कडून करण्यात आला.
            पुस्तकाचे लेखक व अपंग  विकास व वित्त महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री वसंत संखे यांनी आपल्या बालपणात पोलिओ मुळे अपंगत्व आल्यानंतर अनेक अडचणीवर मात करून  जिद्दीने केलेल्या आयुष्यातील प्रवासा बद्दल  व अपंग क्षेत्रात केलेल्या कार्या बद्दल सविस्तर वर्णन केले.या प्रसंगी अपंग क्षेत्रांत कार्यरत असणारे अनेक दिव्यांग कार्यकर्ते,   वंजारी समाजातील तसेच मुंबईतील  आणि पालघर परिसरातील अनेक मान्यवर बंधू- भगीनी  आणि मित्रमंडळी उपस्थीत होते.आभार प्रदर्शन  महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव (कायदा) व माजी विद्युत लोकपाल आणि श्री वसंत संखे यांचे बंधू  श्री रामचंद्र संखे यांनी केले,  तर सूत्रसंचालन दुरदर्शन निवेदिका श्रीमती स्मिता गवाणकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...