निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!
चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे.. त्यासाठी निवडणुकी च्या दिवशी बुधवार सरकारला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यामार्फत काही कर्मचारी नियमावे लागतात. त्यात प्रीसेडिंग अधिकारी १ मतदान अधिकारी १/२/३ शिपाई, पोलीस, एनसीसी, हेडर तसेच स्वच्छता कर्मचारी तसेच मतदारांची लहान मुलं सांभाळण्यासाठी बालसंगोपन केंद्रासाठी आशा वर्कर अंगणवाडी सेविका नियुक्त केलेले होते त्यात त्यांना खालील प्रमाणे मानधन एक दोन तीन दिवसाकरता देण्यात आले होते त्यात प्रीसायडिंग अधिकारी साडेतीनशे रुपये, मतदान अधिकारी १/२/३ यांना दर दिनी अडीचशे रुपये ,बूथवरील शिपाई २०० रुपये ,पोलीस २५० रुपये अशा तऱ्हेने दर दिनी मानधन देण्यात आले .
पण बालसंगोपन केंद्रासाठी कार्यरत आशा , ग्रामपंचायत शिपाई स्वच्छता कर्मचारी यांना १२/१२ तास राबवून फक्त १५० रुपये मानधन देण्यात आल्याने त्यांचेत ड्युटी संपल्यानंतर असंतोष निर्माण झालेला आहे .दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात शिपाई अंगणवाडी कर्मचारी यांना प्रत्येकी ५५० तर, आशा वर्कर वा स्वयंसेवक यांना साडेतीनशे रुपये मानधन देण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यातच एवढे कमी मानधन का देण्यात आले? याबाबत आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा होत आहे.. व संतापही व्यक्त केला जात आहे केंद्र सरकारच्या निवडणूक आयुक्त मार्फत ही निवडणूक होत असता जळगाव जिल्ह्यात वेगळे दर तर बुलढाणा जिल्ह्यात वेगळे द्वारका याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खुलासा करणे आवश्यक आहे या कर्मचाऱ्यांना अक्षरशः राबवून घेतले .काही ठिकाणी तर मुख्य सेविका यांनी अंगणवाडी मदतनिसांना पण हजर ठेवा असे आदेश दिले ने मदतनीस हा सुद्धा हजर राहिल्यात .त्यामुळे दीडशे रुपये मधून निम्मे पैसे 75 रुपये 75 रुपये प्रमाणे मदतनिसांना सुद्धा द्यावे लागले . बीएलओ कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा असंतोष आहे आशा तऱ्हेने केंद्र सरकारच्या व्यवहार खाजगी व्यवस्थापनापेक्षा ही कर्मचाऱ्यांचे शोषण करण्या साठी झालेला आहे अशा तऱ्हेने बेकादेशीर व्यवहार निवडणूक केंद्रावर झालेला आहे याबाबत चौकशी करून बुलढाणा जिल्ह्याप्रमाणे मतदान केंद्रावर आलेल्या नियुक्त करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांना साडेपाचशे रुपये तर मदतनिसांना साडेतीनशे रुपये अदा करावेत अशी मागणी जळगाव जिल्हा आयटक तर्फे संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ अमृत महाजन यांनी केली आहे. किमान वेतन अपेक्षाही निम्म्या वेतनावर राबवून घेतलेल्या या कर्मचाऱ्यांना किमान वेतनइतके मानधन न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा का महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिलेला आहे..
No comments:
Post a Comment