Wednesday 8 February 2023

कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीची विभागस्तरीय अधिकां-याकडून तपासणी, सर्वाच्या कष्टाचे फळ मिळणार !

कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीची विभागस्तरीय अधिकां-याकडून तपासणी, सर्वाच्या कष्टाचे फळ मिळणार !

कल्याण, (संजय कांबळे) : नगर जिल्ह्यातील पद्मश्री पोपटराव पवार यांची हिवरेबाजारही ग्रामपंचायत राज्यात आदर्शवत ठरली होती. याच वाटेवर वाटचाल सुरू झालेली  कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायत ही प्रति हिवरेबाजार ग्रामपंचायत ठरु शकते. 

याच ग्रामपंचायतीची तपासणी  व पाहणी आज राज्यस्तरावरील अधिकां-यानी केली. यावेळी सरपंच परिक्षित पिसाळ, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आजी माझी ग्रामसेवक, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, आणि जांभूळ चे ग्रामस्थ यांनी केलेली मेहनत, कष्ट, पाहता त्यांना प्रथम पुरस्कार मिळून त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल असेच वाटते.
उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या जांभूळ ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार ३२३ इतकी आहे. तर कुंटूबाची संख्या ३९९ इतकी आहे. यामध्ये १२०६ पुरुष तर १११७ स्त्रीया आहेत. सुंदर, नेटनेटके, स्वच्छ अशी गावाची ओळख असून गावाचे नेतृत्व उच्च शिक्षित, शांत संयमी आणि सकारात्मकता हा गुण अंगात ठासून भरलेल्या अश्या परिक्षित पिराजी पिसाळ यांच्या कडे असल्याने जांभूळ गाव काय होते व काय झाले अशी म्हणायची वेळ आली आहे.

गावात सांडपाणी, कचरा, शौचालय, शौषखड्डे, नळपाणी पुरवठा,शाळा, अंगणवाडी, वाचनालय, ग्रंथालय, मंदिरे, रस्ते, दिवाबत्ती, यासह ग्रामपंचायतीचे दस्तऐवज हे सर्व आदर्श वत असेच आहे. गावातील कोपरा न कोपरा, जागोजागी कचरा कुंड्या, यातून दिसून येणारी स्वच्छता प्रकर्षाने जाणवते, अंगणवाडीतील चिमुकले डिजिटल टिव्हीच्या माध्यमातून बडबडणारी लहान मुंल, हे सर्व काही हिवरेबाजार ग्रामपंचायतीप्रमाणे भासते. 

अशा या कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीची तपासणी व पाहणी करण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२०, २१ आणि २०२१, २२चे विभागस्तरीय अधिकारी नितीन मंडलिक, समिती प्रमुख तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिप अलिबाग, आर, एस अंभगराव, उप अभिंयता, जिप पालघर, महादेव शिंदे, विस्तार अधिकारी खालापूर, हे आले होते. भर उन्हात शाळा, अंगणवाडी, शौचालय, शौषखड्डे, पाणी पुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, रेकॉर्ड आदींची तपासणी व पाहणी करून समाधान व्यक्त केले.

यावेळी कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, पशुसंवर्धन अधिकारी, डॉ मांडलेकर, कृषी अधिकारी घोलप, विस्तार हरड,अंगणवाडी च्या विस्तार अधिकारी, एसबी एम चे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायतीचे आजी माझी ग्रामसेवक, सुरोशे, बाळू कोकणे, सरपंच परिक्षित पिसाळ, उपसरपंच ज्योती जाधव, सदस्य सुमन पिसाळ, सुनता गोरे, गुलाब मुकणे, रेखा गायकवाड, अशोक शिंदे, अक्षय सांवत, राजाराम मुकणे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...