Saturday 4 March 2023

रीजन्सी ग्रुप आणि डावखर फाउंडेशन यांच्या एशियातल्या सर्वात मोठ्या पिकल बॉल स्टेडियम चे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते !

रीजन्सी ग्रुप आणि डावखर फाउंडेशन यांच्या एशियातल्या सर्वात मोठ्या पिकल बॉल स्टेडियम चे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते !

"डोंबिवली मध्ये होणार 5 मार्च संध्या 6 वा".

डोंबिवली, प्रतिनिधी : जगातला सर्वात जलद गतीने वाढणारा खेळ म्हणजे पिकल बॉल. कमी अवधित जगप्रसिद्ध होणारा हा खेळ आता कल्याण डोंबिवली करांना देखील खेळता येणार आहे. एशियातलं सर्वात मोठ पिकल बॉल स्टेडियम बेलग्रेव स्टेडियम डोंबिवली मध्ये साकार होत आहे. ज्यामध्ये आठ कोर्ट चार पॅवेलिअन्स असणार आहेत. या स्टेडियमचा उद्घाटन सोहळा रविवार 5 मार्च 2023 रोजी सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम आणि खासदार आमदार नगरसेवक अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 

आजची जीवनशैली पाहता निरोगी राहण्यासाठी आणि चपळता वाढवण्यासाठी पिकल बॉल हा खेळ आवर्जून खेळला जातो. रीजन्सी ग्रुप आणि डावखर फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली करांसाठी भव्य असं स्टेडियम उभारले जात आहे. उद्घाटनाच्या दिवशी देशातील अनेक शहरांमधून पिकल बॉल खेळाडू नॅशनल स्पर्धेसाठी बेलग्रेव स्टेडियमवर येणार आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, झारखंड मधून खेळाडू येत आहेत. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात एशियातलं सर्वात मोठ पिकल बॉल स्टेडियम होत असल्यामुळे विदेशातून देखील अभिनंदनाचा वर्षाव रीजन्सी ग्रुप आणि डावखर फाउंडेशन वर होत आहे. भारतात या खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी अल्पदरात प्रवेश असेल आणि सुरुवातीचे काही दिवस मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये वयोगट 10 ते 18, 18 ते 35, 35 ते 50, 50 ते 60 आणि 60 वर्षे व अधिक या वयोगटात खेळला जाणार असून प्रत्येक वयोगटातील बेस्ट प्लेयर च्या युएस चॅम्पियनशिप चा पूर्ण खर्च डावखर फाउंडेशन उचलणार आहे. कारण दोन वर्षात ऑलम्पिक मध्ये देखील हा खेळ खेळला जाणार असून मोठी संधी उपलब्ध होणार आहे अशी माहिती डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !!

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !! *कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही*         *-...