Thursday 2 March 2023

ठाणे पोलीस आयुक्तालयात क्षेत्रात मनाई आदेश लागू !

ठाणे पोलीस आयुक्तालयात क्षेत्रात मनाई आदेश लागू !
 
ठाणे, प्रतिनिधी : विविध सण, उत्सवाच्या काळात शहरातील नागरिकांना कोणताही त्रास, अडथळा, दुखापत, जिवीतास धोका, आरोग्यास धोका अथवा सार्वजनिक शांततेस बाधा अथवा दंगा, मारामारी होवू नये व त्यास प्रतिबंध केला जावा म्हणून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत   दि. ६ मार्च ते १२ मार्च २०२३ या कालावधीत प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी दिली आहे.

            या कालावधीत सार्वजनिक ठिकाणातील झाडे/लाकडे होळीमध्ये जाळण्यास / दहन करण्याकरीता तोडणे,

सदर सणाच्या निमित्ताने रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना अडवुन त्यांच्याकडुन पैशांची मागणी करणे, सणाच्या निमित्ताने पादचाऱ्यांवर रंग, रंगीत पाणी किंवा पावडर फेकणे अथवा उडविण्याचा प्रयत्न करणे, आरोग्यास अपायकारक होईल अशा रासायनिक रंगांचा वापर करणे, रंगाचे फुगे, पाण्याचे फुगे अथवा इतर द्रव पदार्थाचे फुगे बनविणे अथवा प्लास्टीकच्या पिशव्यांचा वापर करून फेकल्यामुळे आरोग्यास अपाय व जीवास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे, सार्वजनिक जागेत अश्लील शब्द उच्चारणे, घोषणा देणे, अश्लील गाणी गाणे, सार्वजनिक जागेत हावभाव करणे किंवा वाकुल्या व विटंबनाचे प्रदर्शन करणे/ भरविणे किंवा चित्रे/ चिन्हे/प्रतिकृती अथवा कोणत्याही वस्तूंचे अथवा उद्देशाचे की, ज्यामुळे एखाद्याची प्रतिष्ठा, योग्यता वा नैतिकतेला धक्का पोहचेल या प्रकारच्या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.

            हा आदेश दि. ०६ मार्च २०२३ रोजी ००:०० वा. पासून दि. १२ मार्च २०२३ रोजीचे २४.०० वा. पर्यंत अंमलात राहील. ह्या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड प्रक्रिया संहिता कलम १८८ प्रमाणे कारवाई करणेत येईल, असे ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !!

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !! मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :          ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू रुग्णांना मदतीचा हात...