Saturday 4 March 2023

ठाणे येथील महारोजगार मेळाव्यात ४४ कंपन्यांमधील ४१५२ रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न !

ठाणे येथील महारोजगार मेळाव्यात ४४ कंपन्यांमधील ४१५२ रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न !

ठाणे, दि.४: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे मार्फत छत्रपती शिवाजी महाराज मैदान, चिंतामणी चौक, जांभळी नाका ठाणे येथे आज आयोजित स्व. दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात अगदी पाचवी पास उमेदवारापासून बीई, एमबीए अशा विविध पदवीप्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. विविध कंपन्यांनी अशा एकूण ४१५२ पदांसाठी आज मुलाखती घेतल्या. यावेळी ३९८ उमेदवारांची प्राथमिक निवड झाली. तसेच ४७ जणांची अंतिम निवड आली.

या मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या. 

याप्रसंगी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय कुमार पाटील, सहायक आयुक्त श्रीम. संध्या साळुंखे तसेच ठाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीमती. स्मिता माने, विविध कंपन्या, आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक  विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी केले. 

यावेळी मार्गदर्शन करताना श्रीम. संध्या साळुंखे यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. तसेच  मॉडेल करिअर सेंटर, ठाणे मार्फत देण्यात येणाऱ्या समुपदेशन आणि करिअर मार्गदर्शन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

*विविध कंपन्यांचा सहभाग*

मॅजिक बस, युनी केअर हेल्थ केअर, एस ए बी आर रिकृटमेंट, इ पी एल लिमिटेड,  वन स्टेप अवे एल एल पी, ओरा फाईन ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड,  इम्परेटीव्ह बिझनेस वेंचर, युनिमॅक्स पॉलुशन कंट्रोल प्राइवेट लिमिटेड, अक्षर ज्योती, श्रीराम जनरल इन्शुरन्स को. लिमिटेड, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्विसेस, विप्रा स्किल्स इंडिया, हिंदू रोजगार, पी एस आय पी एल, इंडिया फायलिंग, ट्रिनिटी एम्पॉवरमेंट, बझवर्क बिझनेस सर्विसेस, स्मार्ट सर्च कन्सल्टंट, इत्यादी कंपन्यांनी त्यांच्याकडील विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. तसेच क्रोमा इन्फिनिटी रिटेल लिमिटेड, वे कुल फुड्स अँड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी दिव्यांगांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

*स्वयंरोजगारविषयक विविध योजनांचे मार्गदर्शन*

याबरोबरच बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन देण्यासाठी  मेळाव्यामध्ये संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांनी सहभागी होत उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत प्रधान मंत्री मुद्रा योजने संबंधी आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात आली.

No comments:

Post a Comment

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !!

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !! *कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही*         *-...