Friday 5 May 2023

उल्हासनगर शहर वाहतूक शाखेचा दणका, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल पाचशेपन्नास वाहनांवर कारवाई !

उल्हासनगर शहर वाहतूक शाखेचा दणका, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तब्बल पाचशेपन्नास वाहनांवर कारवाई !

कल्याण, (संजय कांबळे) : सर्वसामान्य जनतेमध्ये वाहतूक नियम पालना संदर्भात जनजागृती व्हावी शिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कसूरदार वाहनचालकांना जरब बसावा म्हणून वाहतूक विभाग ठाणे शहर चे पोलीस उप आयुक्त डॉ विनयकुमार राठोड यांच्या आदेशाने व पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर येथे विशेष मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये तब्बल ५४५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये कायद्याची भिती आणि वाहतूक नियमांची महिती असे दोन्ही उद्देश सफल झाल्याचे दिसून येत आहे.

उल्हासनगर शहर उप शाखा यांच्या हद्दीतून कल्याण नगर, कल्याण कर्जत आणि पनवेल असे मार्ग जातात. अशातच मुंबई नंतर उल्हासनगर हे मार्केट संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. साहजिकच त्यामुळे येथील वाहतुक व्यवस्थेवर प्रंचड ताण येत असतो.शहर वाहतूक उपविभाग, उल्हासनगर यांच्या कार्यालयात १ पोलीस निरीक्षक,१ पीएसआय, ३० पोलीस अंमलदार आणि २२ वार्डन यांच्या मदतीने शहरातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जातो.

ब-याच वेळी विविध कारणांमुळे वाहनचालक व वाहतूक पोलीस यांच्या खटके, वादावादी, प्रंसगी भांडण, हाणामाऱ्या झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे जनसामान्य जनतेला वाहतूक नियमांची माहिती व्हावी, जनजागृती व्हावी, याचबरोबर वाहतूक कायद्याची जरब बसावी म्हणून ठाणे  शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ विनयकुमार राठोड यांच्या आदेशान्वये व उल्हासनगर शहर वाहतूक  उप शाखेचे पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दि ३/५/२०२३ ते ४/५/२०२३ या दोन दिवशी विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कसुरदार वाहन चालकावर मोटारवाहन कायदा अतंर्गत वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे २१ ,हेल्मेटचा वापर न करणे १७, सिटबेल्टचा वापर न करणे १०, काळी काच ५, मोटारसायकल वर ३ सिट बसवून वाहन चालविने २६,फँन्सी नंबर प्लेट ३, तसेच अधिसूचनेचे उल्लंघन कलम १७९ प्रमाणे ११६, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षा ७०, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने १०२, आणि इतर १७५ अशी एकूण तब्बल ५४५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे यातून वाहतूक नियमांची माहिती व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कसुरदार वाहनचालकांवर कारवाई असे दोन्ही उद्देश या मोहिमेच्या माध्यमातून राबविण्यात आल्याचे शहर वाहतूक शाखेचे वपोनी विजय गायकवाड सांगितले.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...