Tuesday 2 January 2024

शौर्यदिनानिम्मीत कोरेगाव भीमा येथे महासागर लोटला !!

शौर्यदिनानिम्मीत कोरेगाव भीमा येथे महासागर लोटला !!


पुणे , प्रतिनिधी : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या लाखोंच्या जनसमुदायाच्या मुखात जय भीमचा नारा होता. तरुणवर्ग हातामध्ये निळे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी करीत होते. ऐतिहासिक विजयस्तंभावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. लाखोंचा जनसमुदाय मानवंदना व अभिवादन करण्यासाठी आलेले असताना शौर्यदिनासह मानवंदना कार्यक्रम शांततेत पार पडला.

भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासंघ, दलित पँथर यासह अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. ऐतिहासिक विजयस्तंभावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

भरदुपारच्या उन्हातही भीमसैनिक आणि नागरिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी रांगेत उभे होते. पोलिसांनी अभिवादन स्थळावर जाण्यासाठी चार बाजूंनी रांगा करुन बाहेर पडण्यासाठी पाच रांगा करुनही मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. कोरेगाव भीमा येथे रविवारी रात्रीपासून सुरु असलेल्या गर्दीचा ओघ सोमवारी सकाळपासून वाढायला सुरुवात झाली. तरुण कार्यकर्त्यांसह महिलांची लक्षणीय गर्दी झाली होती. अंदाजे २० ते २५ लाख लोक अभिवादनासाठी आल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवला आहे.

दिवसभरात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, चंद्रकांत हंडोरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, बौद्ध महासभा कार्याध्यक्ष भीमराज आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार प्रकाश गजभिये, समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष दिपिका भालेराव, भीमा कोरेगाव समन्वय समितीचे राहुल डंबाळे आदींनी याकाणी अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभर आंदोलन, हजारो पत्रकार आले रस्त्यावर !!

व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभर आंदोलन, हजारो पत्रकार आले  रस्त्यावर !! ** आता तरी शासनाचे डोळे उघडणार काय?  मुंबई (प्रतिनिधी) : ‘व्ह...