Tuesday, 2 January 2024

रमाबाई नगर , कामराज नगर परिसरात श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम !!

रमाबाई नगर , कामराज नगर परिसरात श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम !!

*पालिका सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे आणि विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांचा पुढाकार*

घाटकोपर, (शांताराम गुडेकर) :

          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाची चळवळ संपूर्ण मुंबई सह राज्यभरात राबवली जात असून नवीन वर्षाच्या मुहूर्तावर घाटकोपर पूर्वेतील रमाबाई नगर आणि कामराज नगर परिसरात महा स्वच्छता अभियान डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या मार्फत घेण्यात आले. या अभियानात विभागातील स्थानिक माजी नगरसेवक आणि विभाग क्रमांक 10 चे शिंदे गटाचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम आणि एन वार्ड सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी विशेष सहकार्य दाखवत अभियानात पुढाकार घेतला.
              पूर्वेतील रमाबाई नगर आणि कामराज नगर हा परिसरात मोठ्या प्रमाणात झोपड्या असून येथे वस्तीत लोकांची वर्दळ आहे. या परिसरात एमएमआरडीए तर्फे लवकरच झोपू योजना राबवण्यात येणार असून स्थानिक तसेच पात्र घरांना येथेच घरे बांधून देण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांनी सांगितले. नवीन वर्षात हे सर्व बदल होत असताना नागरिकांनी स्वच्छता मोहीम मध्ये सहभाग घ्यावा आणि परिसर स्वच्छ सुंदर दिसावं यासाठी आम्ही नागरिकां सोबत तसेच डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या 150 सदस्या मार्फत परिसरात महा स्वच्छता अभियान घेतले. सकाळी 8 ते दुपारी 12 वा पर्यंत ही मोहीम घेण्यात आली. यावेळी एक टन कचरा यावेळी जमा केल्याचे कदम यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!!

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प.) व ज्ञानविकास नाईट हायस्कूल, सायन (पु.) यांची संयुक्त शाळेय समितीची सभा संपन्न !!! मुंब...