Monday 12 August 2024

लाचलुचपत विभाग, ठाणे येथील अधिक्षक लोखंडे यांच्या विरोधात १५ ऑगस्ट २०२४ रोजी करणार आंदोलन - ॲड. स्वप्निल पाटील (अध्यक्ष ठाणे जिल्हा, प्रहार जनशक्ती पक्ष)

लाचलुचपत विभाग, ठाणे येथील अधिक्षक लोखंडे यांच्या विरोधात १५ ऑगस्ट २०२४ रोजी करणार आंदोलन - ॲड. स्वप्निल पाटील (अध्यक्ष ठाणे जिल्हा, प्रहार जनशक्ती पक्ष)

ठाणे, प्रतिनिधी : प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲड स्वप्नील दिलीप पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधत सांगितले की ठाणे जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या अधिक्षक पदी श्री लोखंडे यांनी कार्यभार स्विकारल्या पासून आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात कमी कारवाया केल्या जात आहेत तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. तक्रारीनंतर कमी ट्रॅप लावणे व ट्रॅप लावल्यास कारवाई अगोदरच गोपनीयतेचा भंग करत तो मोडकळीस कसा येईल असे घडत आहे.

मी (ॲड. स्वप्निल दिलीप पाटील) स्वतः उल्हासनगर महानगरपालिकेतील बांधकाम विभागाच्या संपूर्ण कागदोपत्री पुराव्यासहीत माहिती देण्यात येऊन देखील ६ महिन्यात कारवाई नाही. पीडब्ल्यूडी विभागातील भ्रष्टाचाराबाबत उल्हासनगर मधील अनेक नगरसेवक, नागरिक, समाजसेवक यांच्या तक्रारी असूनही कोणतीही चौकशीची देखील तसदी घेतली नाही. 

ॲड स्वप्नील पाटील यांनी पुढं सांगितले की आता आम्ही ठाणे लाचलुचपत विभागाची तक्रार मा. महासंचालक, लाचलुचपत विभाग, मुंबई यांच्या कडे केली असून आता येत्या १५ ऑगस्ट २०२४ (स्वातंत्र्यदिनाच्या) रोजी मा. महासंचालक, लाचलुचपत विभाग, वरळी येथील कार्यालयाबाहेर आपणाकडून न्याय मिळेल या अपेक्षेने आंदोलन करणार आहोत. तरी माध्यमांनी, समाजसेवक व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहवून आम्हास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

संपर्क -
ॲड. स्वप्निल दिलीप पाटील
अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष
ठाणे जिल्हा .
९३२२२१७७७९

No comments:

Post a Comment

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !! ** प्रशांत यादव यांची शरद पवार गट तर्फे विधानसभासाठी अधि...