Sunday 22 September 2024

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

** प्रशांत यादव यांची शरद पवार गट तर्फे विधानसभासाठी अधिकृत उमेदवारी होणार जाहीर 

मुंबई (शांताराम गुडेकर) :

          राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार हे पक्षाला खिंडार पाडणाऱ्याना खिंडीत गाठण्यासाठी महाराष्ट्रभर दौरा करीत आहेत. चिपळूण सभेच्या एक दिवस आधी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील हवामानाचा अंदाज तपासण्यासाठी पवार दाखल झाले आहेत. एकेकाळचे निष्ठावंत आज पाठ फिरवून उभे आहेत त्यांच्याकरीता हा पहिलवानी डाव म्हणजे पेचप्रसंग आहे.

         यात कोण कोण चितपट होणार? हा महत्वपूर्ण विषय आहे. पंचाहत्तरी उलटलेल्या उमद्या नेत्याने पुनः पक्षबांधणी करुन राजकीय विश्लेषकांना‌ आपण राजकारणातील चाणाक्ष चाणाक्य आहोत हे पटवून दिले आहे. या सभेत मान. शरदजी पवार काय बोलणार? कार्यकर्त्यांना कोणत्या सुचना करणार? विरोधकांना कोपरखळ्या, कानपिचक्या की आणखी काही देणार याकडे तमाम जनसामान्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. ही सभा सोमवार दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता चिपळूण नगर परिषदेच्या सावरकर मैदानात, बहादूर शेख नाका येथे होणार आहे.

        वाशिष्ठी मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट चे संस्थापक मा. प्रशांत बबन यादव यांच्यावर पवार साहेबांनी विश्वास दाखवून उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जाहीर घोषणा केली आहे. यादव यांनी संगमेश्वर चिपळूण येथील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी श्वेत क्रांतीचे स्वप्न दाखवले. ओस पडलेले गोठे दुभत्या जनावरांनी पुन्हा भरू लागले आहेत. युवक, महिला, पुरुष शेतकरी हा सुखद अनुभव अनुभवत आहेत. ही सभा राजकीय नेते, कार्यकर्ते, विरोधक सगळ्यांची उत्कंठा वाढवीत आहे. उद्या प्रशांत यादव यांची उमेदवार म्हणून अधिकृत घोषना होईल.

         राष्ट्रवादी शरद पवार गटात गेल्या दीड वर्षी पूर्वी कौग्रेस तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन प्रशांतजी यादव यांनी अधिकृत प्रवेश केला आहे. शरदजी पवार यांच्या गटात पण त्यांनी कमी कालावधी जणसामान्य जनतेला विश्वासात घेऊन थेट ग्रामीण शहरी भागात जनतेशी नाळ जोडली आहे. त्यांनी आपल्या वासिस्ट मिल्क प्रॉडक्ट्स या आपल्या व्यवसायात लक्ष देऊन शेतकरी वर्ग यांना हाताला काम देण्याचे विशेष काम केले आहे. बेकारी दूर करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही आहे. आज चिपळूण ते संगमेश्वर ग्रामीण भागात त्यांनी तुतारी हे चिन्ह घरो -घरो पोचवले आहे. आज 'चिपळूण संगमेश्वर या विधानसभे'मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे.

No comments:

Post a Comment

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !!

सोमवारी चिपळूण येथे 'राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार' यांची जाहीर सभा !! ** प्रशांत यादव यांची शरद पवार गट तर्फे विधानसभासाठी अधि...