Tuesday 2 January 2024

अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीत मा. शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी - *लोकस्वराज्य'चे संस्थापकप्रा. रामचंद्र भरांडे यांचे प्रतिपादन.*

अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या बाबतीत मा. शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी - *लोकस्वराज्य'चे संस्थापक
प्रा. रामचंद्र भरांडे यांचे प्रतिपादन.*

नांदेड, प्रतिनिधी :- राज्यात अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अ ब क ड करण्यात यावे यासाठी गेल्या 30  वर्षापासून संघर्ष सुरू असून अनुसूचित जाती संवर्गासाठी असणारे 13 टक्के आरक्षण 59 उपजातीसाठी असून या आरक्षणाचा लाभ प्रबळ व सक्षम जातीच घेत असून कमजोर व दुर्लक्षित जाते आरक्षणाच्या लाभांपासून वंचित असल्याने अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असलेल्या जातींचा विकास समतोल प्रमाणात होत नाही. त्यामुळे विषमता निर्माण झाली आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील समाज उभा करायचा असेल तर अनुसूचित जातीमध्ये अ ब क ड असे वर्गीकरण करणे गरजेचे असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरद चंद्र पवार यांनी याबाबतीतली त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी मागणी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत दिले आहे. देशात आणि राज्यात मनुस्मृतीला प्रमाण मानून राज्यकारभार करणारे पक्ष सत्तेत आले असून या सत्ताधाऱ्यापासून संविधान व भारतीय लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला  झाला आहे. धर्मांध विचारसरणीच्या पक्षांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सत्तेचे, अधिकाराचे, सामाजिक  न्यायाचे समान वाटप होणे गरजेचे आहे,तेंव्हाच देशातील वंचित, पीडित, शोषित समूह समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी होऊ शकतो अन्यथा तो आपल्या मानवी अधिकारापासून कोसो दूर राहणार आहे. देशाचे ऐक्य, अखंडत्व, सार्वभौमत्व, लोकशाही, संविधान या सर्व सर्व बाबी सुरक्षित ठेवण्यासाठी *धर्मांध शक्ती आरएसएस हटाव, संविधान लोकशाही बचाव* हा नारा देणे काळाची गरज आहे. देश विकण्यासाठी भांडवलदार आणि धर्मांध राजकारणी तत्पर असलेले उघड्या डोळ्यांनी सारा देश पाहत असून यांच्या तावडीतून देशाला सोडविण्यासाठी शेतकरी, सामान्य शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार, आदिवासी, दलित, धार्मिक अल्पसंख्यांक निश्चितपणाने सकारात्मक योगदान देऊ शकतो. या सर्व घटकांना शरद पवारांनी विश्वासाने हाक द्यावी व सामाजिक न्यायाच्या वाटपाची हमी देण्याची भूमिका शिर्डी येथे होत असलेल्या कार्यकर्ता शिबिरात स्पष्ट करावी असे प्रतिपादन प्रा. रामचंद्र भरांडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

'विश्वात हिंदी भाषे'चे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे - रानी अनिक चंद्र मिश्रा

'विश्वात हिंदी भाषे'चे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ आहे - रानी अनिक चंद्र मिश्रा ** संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात हिंदी सप्ताह...