Wednesday, 3 July 2024

रविवारी ठाण्यात होणार एकलव्य गौरव पुरस्कार सोहळा !!

रविवारी ठाण्यात होणार एकलव्य गौरव पुरस्कार सोहळा !!

ठाणे, प्रतिनिधी : दर वर्षी प्रमाणे या वर्षी येत्या रविवारी ७ जुलै रोजी समता विचार प्रसारक संस्थेचा एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रम ठाण्यात स्टेशन रोड येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात सकाळी १० वाजता संपन्न होत आहे. या वेळी सुप्रसिद्ध पत्रकार अलका धूपकर, राबोडी फ्रेंड सर्कल शाळेचे मुख्याध्यापक डॉ. नसीब मुल्ला आणि चित्रकार व कला शिक्षक आणि माजी एकलव्य दिनेश जाधव हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेच्या विश्वस्त मीनल उत्तुरकर असतील. 

ठाणे महानगर पालिकेच्या शाळेत शिकत, घरातील आर्थिक चणचणीचा आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर दहावी पास करणाऱ्यांचे यश हे एकलव्याच्या साधने सारखेच आहे असे मानून या एकलव्यांचा सन्मान संस्थेतर्फे दर वर्षी केला जातो. हे एकलव्य गौरव पुरस्काराचे ३३ वे वर्ष आहे. यंदा २४६ मुलांचा सन्मान प्रशस्ती पत्र आणि बक्षीस देऊन होणार आहे. सहृदय आणि संवेदनशील ठाणेकरांनी नेहमीप्रमाणे या वर्षीही या कार्यक्रमाला आवर्जून यावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्यकारी सचिव अजय भोसले ( 81089 49102) यांच्याशी संपर्क करावा.


No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...