Tuesday 2 July 2024

कोकण सुपुत्र चंद्रकांत करंबळे यांना "लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड "पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सन्मा.श्री.देवेंद्र उपाध्याय यांनी दिल्या अभिनंदनसह शुभेच्छा !!

कोकण सुपुत्र चंद्रकांत  करंबळे यांना  "लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड "पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सन्मा.श्री.देवेंद्र उपाध्याय यांनी दिल्या अभिनंदनसह शुभेच्छा !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
          आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदुत संघटना,युवा महाराष्ट्र फॉउंडेशन, पोलीस मित्र माहिती अधिकार, पत्रकार संरक्षण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने "आयकॉन महाराष्ट्र पुरस्कार -२०२४ तसेच लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रदान पुरस्कार वितरण सोहळा पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घुले रोड, बालगंधर्व जवळ, पुणे येथे भारतातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते थाटामाटात पार पडला. या थाटामाटात पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात भारतातील अनेक राज्यातील सामाजिक, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, पोलीस, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले पुरस्कार प्राप्त व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये मुंबई येथील बांद्रा येथे वास्तव्यास असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका मधील गवाणे गावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक  मुंबईसह मुंबई उपनगर, कोकण सह महाराष्ट्र मधील विविध संस्था, मंडळ, प्रतिष्ठान, प्रसिद्धी माध्यम, सामाजिक संस्थाचे विविध पुरस्कार विजेते कोकण सुपुत्र समाजसेवक श्री. चंद्रकांत करंबळे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल  "लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड "पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सन्मा. श्री.देवेंद्र उपाध्याय यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनसह शुभेच्छा देण्यात आल्या. हायकोर्ट एम्प्लॉइज को.ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांनी शनिवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन  मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय मुख्य न्यायमूर्ती श्री. देवेंद्र कुमार उपाध्याय साहेब व सन्माननीय न्यायमूर्ती जितेंद्र जैन साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.विविध पुरस्कार विजेते कोकण सुपुत्र समाजसेवक श्री. चंद्रकांत करंबळे यांना  मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सन्मा. देवेंद्र उपाध्याय  व न्यायमूर्ती जितेंद्र  जैन साहेब यांनी शुभेच्छा देताना हायकोर्ट सोसायटीचे अध्यक्ष सनी हौसलमल, उपाध्यक्ष चंद्रकांत सरवणकर, सचिव राहुल कदम ,सहसचिव -सौ.अनघा करकंडे, खजिनदार -विनोद भोसले, सहखजिनदार अमोल शिंदे, संचालक- दीपक धुमाळ, चंद्रकांत करंबळे ,संचालिका-सौ.मुक्ता नागणे - कदम ,संचालक-डॉ.अमोल राऊत, रवी पवार, राजेंद्र खिलारी, व्यवस्थापक- संजय बेलोसे, लिपिका - नमिता मुसळे व उपस्थित अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग  तसेच नायर हॉस्पिटल मधील रक्तशिबिरासाठी आलेले डॉक्टर वृंद, अन्य कर्मचारी वर्ग, पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनीही करंबळे यांना अभिनंदन करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभर आंदोलन, हजारो पत्रकार आले रस्त्यावर !!

व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभर आंदोलन, हजारो पत्रकार आले  रस्त्यावर !! ** आता तरी शासनाचे डोळे उघडणार काय?  मुंबई (प्रतिनिधी) : ‘व्ह...