Wednesday 24 July 2024

आयटीआय औंध येथे मराठी लघुलेखन अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ !!

आयटीआय औंध येथे मराठी लघुलेखन अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ !!

पुणे, प्रतिनिधी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे सत्र २०२४-२५ करीता मराठी लघुलेखन (स्टेनोग्राफी) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून या प्रवेशासाठी मान्यता मिळाली असून २४ प्रशिक्षणार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सूरू झाली असून https://msbsvet.edu.in या लिंकवरुन प्रशिक्षणार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच प्रवेशाकरीता आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रत उमेदवारांनी संस्थेमध्ये १ ऑगस्ट पर्यंत जमा करणे आवश्यक आहे.

उमेदवारांची गुणवत्ता यादी ३ ऑगस्ट रोजी तयार करण्यात येणार असून प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही ६ ऑगस्ट रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे येथील मुख्य इमारतीच्या कौशल्य हॉल येथे होणार आहे. प्रवेशित उमेदवारांचे नियमित प्रशिक्षण ७ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे, अशी माहिती आयटीआयचे उपप्राचार्य ए.ए. साबळे  यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...