Tuesday 3 September 2024

उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी घेतली टेकचेज २०२४ ची अनोखी सफर !!

उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी घेतली टेकचेज २०२४ ची अनोखी सफर !!

विरार प्रतिनिधी / पंकज चव्हाण

विरार पूर्व येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या  विवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी पंधराव्या 'टेकचेज २०२४ 'युगांतर’ या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ३० आणि ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत करण्यात आलेले होते. विवा टेक्नॉलॉजीच्या  ७ विभागांतर्गत २१ विविध नावीन्यपूर्ण इव्हेंट्स आणि तंत्रज्ञान प्रकल्पाचे प्रदर्शन घेण्यात आले.  

या टेकचेज साठी  कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि बारावीनंतर अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या नवनवीन संधी याबद्दल माहिती जाणून घेतली. महाविद्यालयात असणाऱ्या विविध अभियांत्रिकी शाखा  यासंदर्भात उपप्राचार्या डॉ. अर्चना इंगळे ह्यांनी उत्तम मार्गदर्शन केले. 

विज्ञान शाखेतील ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी विवा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचा परिसर आणि विविध अभियांत्रिकी शाखा या संदर्भात माहिती मिळाल्यामुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रवेश आणि शाखा निवड या संदर्भात मार्गदर्शन मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. 

विद्यार्थ्यांना ही अनोखी सफर यशस्वी होण्यासाठी समन्वयक म्हणून डॉ. चिन्मय पिंगुळकर आणि डॉ. महेंद्र घरत आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शिक्षक यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...