Friday 13 September 2024

महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी स्वराज अभियान आक्रमक !!

महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी स्वराज अभियान आक्रमक !!

**शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांचा अभाव....

नालासोपारा, प्रतिनिधी :- वसई  विरार नालासोपारा शहरात २५ लाखाहुन अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात  महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत व महापालिकेने विविध ठिकाणी बांधलेल्या ९४ सार्वजनिक स्वच्छतागृहांमधूनच महिलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

यामध्ये महिला व पुरूषांसाठी समसमान जागा देण्यात आली आहे म्हणजे एकाच स्वच्छतागृहांमध्ये एका भिंतीआड पुरूष आणि महिला दोघाःसाठी जागा आहे मात्र असे असले तरी महिलांसाठी वेगळे व स्वतंत्र स्वच्छतागृह आवश्यक आहे. त्यामुळे महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृहेच नाही आहेत. हि अतिशय धक्कादायक व लाजिरवाणी बाब आहे,

*आमदारांची पत्नी मनपात प्रथम महापौर होऊन गेल्या तरी त्यांचा काळात फक्त या विषयावर चर्चाच झाल्या अशी टिका  स्वराज अभियान च्या रूचिता नाईक यांनी केली.*

अनेकदा पुरुषी मानसिकतेचा सामना महिलांना करावा लागतो. संघर्ष करावा लागतो. आजही आमच्या भगिनींना अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्याही वाढत आहे परंतु शहरात स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने महिलांची कुचंबणा होत आहे.घराबाहेर पडल्यानंतर सुरक्षित स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने महिलांना कार्यालय वा घरी जाईपर्यंत उत्सर्जन विधी रोखुन ठेवावे लागते. त्याचा त्यांचा आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होत असतो यामुळे महिलांना मूत्रपिंड, लैंगिक आजार, त्वचाविकार, पोटदुखी अशा विविध आजार संभवतात.

परिसरात एकत्र स्वच्छतागृह आसल्याने पुरुषांची नेहमी गर्दी असल्याने महिला जाण्यास टाळाटाळ करतात. बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि इतर ठिकाणी काही सामाजिक संस्थेकडून स्वच्छतागृह ठेकेदार पध्दतीने चालवले जातात. बहुतांश ठेकेदार हे स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकेडे दुर्लक्ष करतात व त्याठिकाणी पैसै घेण्यास पुरूष च असल्याने महिलांची कुचंबणा होते. महापालिकेने फक्त महिलांसाठीच स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारलेली नाहीत.

वसई-विरार- नालासोपारा या शहरांमध्ये स्वच्छतागृहे बांधण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे, परंतु याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे आणि ती स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पीय तरतूद असताना हि वसई विरार महानगरपालिकेचा महिलांबाबत एवढा निष्काळजीपणा का? 

----महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बाधण्याबाबत स्वराज अभियान च्या रूचिता नाईक यांची आयुक्तांकडे मागणी..

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...