कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा !!
उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) :
कोकण ज्ञानपीठचे उरण वाणिज्य कला महाविद्यालय वाणिज्य विभाग व अजीवन अध्ययन निरंतर व विस्तार विभागातर्फे उरण महाविद्यालयामध्ये जागतिक ग्राहक हक्क दिन (World Consumer Right Day) प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांच्या मार्गदर्शनानुसार साजरा करण्यात आला.
जागतिक ग्राहक हक्क दिनाचे उद्दिष्टे व महत्त्व प्रा. व्ही. एस. इंदुलकर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्तावनेत स्पष्ट केले. ग्राहक हा राजा आहे व त्याचे कायद्याने दिलेले मूलभूत हक्क याबाबत विश्लेषण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रवींद्र चव्हाण, साकलेन डाखवे , खुशी शर्मा व देवयानी खैरनार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे ग्राहक हक्क व दिनाचे महत्त्व आपल्या उत्कृष्ट वकृत्व शैलीत व्यक्त केले. सदर विद्यार्थ्यांचे मनोगत खूपच प्रभावी होते. मुंबई विद्यापीठाचे अभ्यास मंडळाचे सदस्य व पीएचडी गाईड डॉ. पराग कारुळकर हे देखील कार्यक्रमास हजर होते. ग्राहकाचे हक्क व संरक्षण याबद्दलचे महत्त्व उदाहरणासहित देऊन स्पष्ट केले व प्रत्यक्षात आपले अनुभव त्यांनी सर्वांना सांगितले. शेवटी कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. व्ही एस इंदुलकर यांनी सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment