Saturday, 21 March 2026

फॉन संघटनेच्या वेस्ट मधून बेस्ट संकल्पने अंतर्गत चिमण्यासाठी बनविले घरटे !!

फॉन संघटनेच्या वेस्ट मधून बेस्ट संकल्पने अंतर्गत चिमण्यासाठी बनविले घरटे !!

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) : रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्,कॉमर्स  अँड सायन्स,आवरे (उरण) येथे जागतिक चिमणीदिन  निमित्ताने फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन)ची वेस्ट मधून बेस्ट या संकल्पनेतून चिमणी घरटे बनविण्याची कार्यशाळा पार पडली.

फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )च्या टीम द्वारे विद्यार्थ्यांना कागदी पुठ्ठ्याच्या टाकाऊ रोल पासून चिमण्यांची घरटी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.१०० घरटी बनवून ती विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. चिमण्यांची घटती संख्या, त्यामागची कारणे-धोके  व चिमण्यांची संख्या कशी वाढविता येईल याविषयी फॉन च्या टीमने विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले.या कार्यशाळेस विद्यालयाचे प्राचार्य सुभाष ठाकूर, सर्व शिक्षकवृंद व सहकाऱ्यांचे योगदान लाभले. फॉन संस्थेच्या वतीने जयवंत ठाकूर व दिनेश चिरनेरकर हे सहभागी  झाले होते

No comments:

Post a Comment

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्याची विजय विकास सामाजिक संस्थेची मागणी !!

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्याची विजय विकास सामाजिक संस्थेची मागणी !! *...