Saturday, 21 March 2026

कु. युगसाई अविनाश म्हात्रे यांच्या तर्फे नवघर जिल्हा परिषद शाळेस आर्थिक मदत !!

कु. युगसाई अविनाश म्हात्रे यांच्या तर्फे नवघर जिल्हा परिषद शाळेस आर्थिक मदत !!

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) :
नवघर गावातील सामाजिक कार्यकर्ते शिक्षण प्रेमी माजी विद्यार्थी महासंघ शाळा नवघरचे कोषाध्यक्ष हिंदूहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक विद्यमान शाखाप्रमुख  अविनाश एकनाथ म्हात्रे यांच्या मुलाचा कु. युगसाई अविनाश म्हात्रे याचा ९ वा वाढदिवसा निमित्त ग्रामपंचायत नवघरचे विद्यमान उपसरपंच प्रियदर्शनी अविनाश म्हात्रे यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा नवघरच्या नवीन इमारती बांधकामासाठी आर्थिक सहकार्य १११२१/- रुपयाचा धनादेश शाळेतील मुख्याध्यापक श्रीम. समता ठाकूर , उषा गावंड , श्रीमती सरिता गोरे , गणेश गावंड, प्रकाश जोशी, अनिल म्हात्रे आणि  प्रसाद म्हात्रे  यांच्याकडे देण्यात आला. 

शाळेतर्फे  युग साई बाळाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या  शुभेच्छा देण्यात आल्या व त्याचे  व आई वडिलांचे शाळेतर्फे आभार मानण्यात आले. शिक्षणप्रेमी अविनाश म्हात्रे व त्यांच्या पत्नी प्रियदर्शनी व त्यांचा मुलगा कु. युगसाई यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. युगसाई याच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्याची विजय विकास सामाजिक संस्थेची मागणी !!

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ "लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन" उभारण्याची विजय विकास सामाजिक संस्थेची मागणी !! *...