कल्याण येथे अभियंता दिन उत्साहात साजरा.
कल्याण -
जैनेंन्द्र सैतवाल -
शिक्षक दिन, बाल दिन, मातृ दिन असे बरेच दिन आपण साजरे करीत असतो. त्यातीलच बऱ्याच नागरिकांना माहीत नसलेला दिन म्हणजे "अभियंता दिन ". नुकताच १५ सप्टेंबर २०१८ रोजी कल्याण येथील विश्राम गृह येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे "अभियंता दिन" आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी कार्यकारी अभियंता प्रदीप दळवी यांनी उपस्थित अधिकाऱ्याना मार्गदर्शन केले। व त्या हस्ते। शाखा अभियंते व उपअभियंते यांचा सत्कार करण्यात आला.
जेष्ठ अभियंता भारतरत्न सर मोक्षगंधन विश्वसरय्या यांना अभिवादन करून सार्वजनिक बांधकाम उपविभाग १,२ यांनी एक छोटेखानी अभियंता दिन परिसंवाद कार्यक्रम येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हासनगरचे उपअभियंता ढिलपे, प्रमुख पाहुणे कार्यकारी अभियंता प्रदीप दळवी, उपकार्यकारी अभियंता गलांधर, शाखा अभियंता पी. टी. मानकर, सूत्र संचालन उपअभियंता मुरबाड चे आर.आर.सोमवंशी यांच्या उपस्थितीत विभाग १,२ चे अभियंता, टेक्निकल असिस्टंट, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, कल्याण येथील विभाग १,२ चे शाखा अभियंता, टेक्निकल असिस्टंट, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मोठया खेळी-मेळीच्या वातावरणात "अभियंता दिन" जल्लोषात साजरा करण्यात आला.
बातमीदार माझा परिवाराकडून सर्व अभियंत्यांना "अभियंता दीना" च्या भरघोस शुभेच्छा!
No comments:
Post a Comment