*काविळ, हिपोटाईटीस- B, H1N1, ड्येंगु साठी केलेल्या अभ्यासानुसार कोरोना व्हायरस सारखा आजार निश्चितच ठिक केला जाऊ शकतो. --- डॉ जितेंद्र पाटील*
संपुर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे, जगात मेडिकल उपचारासाठी दोन नंबर वर असणारा इटली सारखा देश, जागतिक महासत्ता अमेरिका, प्रगत अशी राष्ट्र इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, असे देश, तसेच जगातील २०० च्या जवळपास देश त्रस्त असताना. अजूनही यावर यशस्वी उपचार पद्धती नसताना, कल्याण येथील एक डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना असे सांगितले की संपूर्ण मानवजातीला, विज्ञानाला निसर्गाने दिलेले हे आव्हान याला अजूनही कोणाकडे उत्तर नाही, मी असा विचार केला प्रश्न आहे तिथे उत्तर असणारच, आज संपूर्ण जगासमोर एकच प्रश्न आहे कोरोना व्हायरस त्यावर निश्चित व ठोस असा उपाय माझ्या कडे आहे, ते आणखीन पुढे म्हणाले की जग ज्याला व्हायरस म्हणत आहे तो मुळात व्हायरस नसून प्रोटीन मालेक्युल (अनुकण) आहे, जो जिवंत नसून तो कण त्याला चरबीचा थर आहे. जसे थंडीत तूप घट्ट होते तसेच हा प्रोटीन मालेक्युल चरबीयुक्त असल्याने घट्ट होतो. जेव्हा थंड वातावरणात हे अनुतत्व घशात प्रवेश केल्यानंतर घट्टपणा निर्माण करतात व घशात प्रवेश केल्यानंतर ज्याप्रमाणे अमीबा हा पेशींचा समुह असतो तसा हा अनुकण पेशींच्या संपर्कात आल्यानंतर यांची वाढ होते व घशाचा मार्ग अवरुद्ध होऊन श्र्वास घ्यायला त्रास होतो, पुढे फुफ्फुसात गेल्यानंतर कफाचे प्रमाण वाढत जाते व दम्या सारखे लक्षण तयार होऊन रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
या सर्व लक्षणांवर अॅंटीव्हायरल किट या हर्बल आयुर्वेदिक औषधांचा चांगला फरक पडतो, पहिल्या स्टेज पासून शेवटच्या स्टेज पर्यंत हे औषध दिले जाऊ शकते विशेष म्हणजे हे किट काविळ, हिपोटाईटीस- B, H1N1, ड्येंगु साठी सुध्दा उपयोगी आहे मी केलेल्या अभ्यासानुसार कोरोना व्हायरस सारखा आजार निश्चितच ठिक केला जाऊ शकतो.
डॉ जितेंद्र पाटील यांनी आधी मेल व्दारे पंतप्रधान, स्वास्थ मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय यांना कळविले आहे, व अशी मागणी केली या औषधाविषयी मी भारत सरकार, राज्य सरकार, किंवा या साठी नेमणूक करण्यात आलेले तज्ञ डॉक्टर यांच्या सोबत चर्चेची तयारी आहे, या सर्वांना सामोरे जाताना कोरोना (कोविड-१९) वर यशस्वी उपचार करण्याची खात्री आहे.
No comments:
Post a Comment