महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या कामगिरीचा नागरिकांना वाटतोय अभिमान
संपूर्ण जगासमोर कोरोनाचे संकट उभे राहिले असताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशात २२ मार्च पासून २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. याला राज्य सरकारने पाठिंबा देताना सर्व नागरिकांना स्वतःच्या सुरक्षेसाठी घरातच रहाण्याचे व काही कारणांमुळे बाहेर जाण्याची गरज असल्यास सुरक्षित अंतर ठेवणे, चेहऱ्यावर मास्क वापरणे निश्चित केले, अशा वेळी आरोग्य यंत्रणा व पोलिस प्रशासन या दोघांवर फार मोठी जबाबदारी आली. यातील पोलिस प्रशासनावर हा आजारामुळे इतर देशांत जी परिस्थिती निर्माण झाली तशी आपल्या देशात निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांना जागरूक करणे व वेळप्रसंगी खंबीर पावले उचलून लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवणे.
भारतातील सर्व पोलीसांनी ही जबाबदारी जशी समर्थ पणे हाताळली तशीच जबाबदारी हाताळताना कल्याण येथील महात्मा फुले पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण बनकर, क्राईम पोलिस निरीक्षक संभाजी जाधव, पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस निरीक्षक दीपक सरोदे, तसेच पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, पोलिस सहायक आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहाड, वल्लिपीर नाका, शिवाजी चौक, सहजानंद चौक, वालधुनी या ठिकाणी नाकाबंदी केली, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना समजून सांगणे, तरीही न ऐकणाऱ्यांवर कारवाई करणे, विनाकारण गाड्या फिरवणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी १०० च्या आसपास टु व्हिलर, ५/६, पोरं व्हिलर, १० च्या आसपास ऑटो यांच्या वर जप्तीची व १२५ विनाकारण फिरणारे आरोपी यांच्या वर कारवाई केली, तसेच स्वतः पोलिस स्टेशन व सामाजिक संस्था मार्फत गरजूंना अन्न धान्य वाटप केले, मुके प्राणी सुध्दा उपाशी रहाणार नाहीत अशी काळजी स्वतः पोलिस स्टेशन व संस्था मार्फत घेत आहेत. ज्या दुकानात नियमांचे पालन जसे वेळेचे बंधन न पाळणे, तसेच गिऱ्हाईक यांना सुरक्षित अंतर ठेवणे यासाठी अधोरेखित न करणे यांवर सुध्दा कारवाई केली.
महात्मा फुले पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार कोरोना विरूद्ध लढाईत नागरिकांना साथ दिली व देत आहेत यामुळे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागरिकांनी आम्हाला आमच्या पोलिस स्टेशनचा अभिमान वाटतो असे सांगितले.
No comments:
Post a Comment