लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेची केंद्रीय कोअर कमिटी प्रस्थापित
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) गेली अनेक वर्षे संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्हा आणि तालुका स्तरावर तसेच ग्रामीण भागातील सर्वत्र कानाकोपऱ्यात निस्वार्थ आणि निर्मोही भावनेने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात मानवतेच्या व सामाजिक उत्तरदायीत्व जाणिवेतून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्याचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तीमत्व, सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. संजय सोनावणे संस्थापित लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र या बहुचर्चित सामाजिक संस्थेच्या केंद्रीय कोअर कमिटीच्या कार्यकारी मंडळात पुढील प्रमाणे दिग्गज व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.
डाॅ.संजय अनुसया राजाराम सोनावणे अध्यक्ष ,
श्री. मिलिंद शेट उपाध्यक्ष.श्री.सुधाकर पालकर सचिव , श्री. प्रशांत पाटील सचिव, श्री. निलेश सोनावणे जनसंपर्क अधिकारी, श्री. धम्मशिल सावंत जनसंपर्क अधिकारी ,श्री. स्वराज सोनावणे मुख्य विश्वस्त, ॲड. श्री. प्रथमेश जावळे विधी सल्लागार, श्री. सुदेश जूईकर वरीष्ठ सल्लागार, श्री. विनोद सापळे वरीष्ठ सल्लागार,श्री. खेमराज रावळ निमंत्रक , श्री. प्रदीप सोनावणे सदस्य, श्री. मनोहर कांबळे सदस्य, श्री. राजेंद्र वाढवळ सदस्य ,
श्री. बाजीराव गायकवाड सदस्य, श्री. गौतम जाधव सदस्य ,
श्री. मिलन तेंडुलकर प्रसिद्धी प्रमुख, श्री. संजय कदम प्रसिद्धी प्रमुख या प्रमाणे केंद्रीय कोअर कमिटी जाहीर करण्यात येत आहे. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.
डाॅ. संजय अनुसया राजाराम सोनावणे अध्यक्ष.
सदर माहिती लोकशक्ती संजिवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचे संस्थापक, नामवंत उद्योजक, दानशूर व्यक्तीमत्व , वंचित, शोषित, गोरगरिबांचे तारणहार तथा कैवारी डॉ संजय राजाराम सोनवणे साहेब यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रसिद्धी साठी दिली आहे.

No comments:
Post a Comment