Tuesday, 26 May 2020

शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त 'दगडूशेठ' ला ५०१ फळांचा नैवेद्य

शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त 'दगडूशेठ' ला ५०१ फळांचा नैवेद्य


पुणे - ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे संत्री, मोसंबी, टरबूज, केळी, डाळींब,आंबे, पेर, चिक्कू, अंजीर ,अननस, लिची अशा विविधरंगी ५०१  फळांचा फळांचा नैवेद्य दगडूशेठ गणपतीला दाखविण्यात आला.

याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे ‘श्रीं’ना फळे व फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीनिमित्त मंदिरात गणेशयाग देखील झाला. फळे व फुलांच्या आकर्षक सजावटीसोबतच श्री गणेशाला फुलांचा पोशाख करण्यात आला.

त्यामध्ये मुकुट, अंगरखा, शुंडाभूषण यासह विविध अलंकार फुलांमध्ये साकारण्यात आले होते. 

भक्तांनी ट्रस्टचे संकेतस्थळ www.dagdushethganpati.com, फेसबुक, ट्विटर, यु टयूब आणि अ‍ॅप येथे श्रीं चे ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती ! ** माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांचा ध...